मुंबई

विजयदुर्ग-मुंबई रो-रो फेरी रद्द; अपघात की तांत्रिक बिघाड

CD

विजयदुर्ग-मुंबई रो-रो फेरी रद्द; अपघात की तांत्रिक बिघाड
- देवगडजवळ अडचण; प्रवाशांचे आरक्षण पैसे परत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबई-विजयदुर्ग यादरम्यान सुरू करण्यात आलेल्या रो-रो फेरीसेवेची गुरुवारी नियोजित फेरी रद्द करण्यात आली. बोटीला किरकोळ अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असली तरी सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नेमके कारण काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजयदुर्ग-मुंबई मार्गावरील रो-रो फेरी देवगड परिसरात असताना बोटीमध्ये अडचण निर्माण झाल्याचे लक्षात आले. सुरक्षेच्या कारणास्तव पुढील प्रवास न करता फेरी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. बोट सुरक्षितपणे मुंबईत दाखल झाली असून, कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही.

दरम्यान, या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रो-रो बोट समुद्रात उभी दिसत असून, तिच्या बाजूला एक लाकडी बोट लागलेली दिसते. त्या लाकडी बोटीत तीन ते चार व्यक्ती दिसत असल्याचेही व्हिडिओत दिसून येते. त्यामुळे रो-रो बोटीचा अपघात झाला का, की केवळ तांत्रिक बिघाडामुळे ती थांबवावी लागली, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र बोटीला तांत्रिक बिघाड झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून फेरी रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या फेरीसाठी आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांना पूर्ण रक्कम परत करण्यात आली आहे. बोटीची तपासणी करण्यात येत असून, पुढील फेऱ्या नियोजित वेळापत्रकानुसार सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

T20 WC, IND vs ENG: अक्षर पटेल मागे पळाला अन् सूर मारत अफळातून कॅच पकडला, गंभीरही खूश अन् बुमरहाचाही मोठा विक्रम

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Alandi News : आळंदी इंद्रायणी घाटावर महिलांमार्फत खुलेआम मद्यविक्री, धार्मिक स्थळांचे विडंबन

SCROLL FOR NEXT