कॅनरा रोबेको बँकिंग अँड फायनान्शियल सर्विसेस फंड
मुंबई, ता. ८ : कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडातर्फे कॅनरा रोबेको बँकिंग अँड फायनान्शियल सर्विसेस फंड बाजारात आणला आहे. या फंडातून बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्रात गुंतवणूक केली जाईल.
या फंडात १३ मार्चपर्यंत गुंतवणूक करता येईल. न्यू फंड ऑफर कालावधीत किमान गुंतवणूक ५,००० रुपयांपर्यंत असेल आणि त्यानंतर एक रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. ही योजना आपल्या एकूण मालमत्तेपैकी किमान ८० टक्के हिस्सा बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर आणि शेअरशी संबंधित साधनांमध्ये गुंतवेल. उर्वरित हिस्सा इतर क्षेत्रांतील शेअर, कर्ज साधने, चलनबाजार साधने आणि इनव्हिट्समध्ये गुंतवला जाईल.
बँकिंग व आर्थिक सेवा हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक आहेत. या एनएफओच्या माध्यमातून आम्ही गुंतवणूकदारांना या गतीमध्ये सहभागी होण्याची संधी देत आहोत. त्याद्वारे त्यांना दीर्घकालीन मालमत्ता निर्मिती करण्यास तसेच चांगले आर्थिक भविष्य घडविण्यास मदत होईल, असे कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश नरूला म्हणाले.
बँका, वित्तसेवा हे क्षेत्र जरी आपल्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असला तरीही हे क्षेत्र अद्यापही देशात सर्वत्र खोलवर गेलेले नाही, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी हे क्षेत्र आणखीन मोठे केले पाहिजे. अर्थात भविष्यात हे क्षेत्र सतत वाढते राहणारच आहे. तरीही गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत या क्षेत्राचे मूल्यांकन सध्या अत्यंत रास्त आहे, त्यामुळे यात गुंतवणुकीला मोठा वाव आहे, असे कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लि.च्या इक्विटीजचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर श्रीदत्त भांडवलदार यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
या फंडातून सरकारी बँका, खासगी बँका, बिगरबँक वित्तसंस्था, असेट मॅनेजमेंट कंपन्या, विमा कंपन्या, फिनटेक कंपन्या, भांडवली बाजार आदी सर्व आर्थिक क्षेत्रात गुंतवणूक केली जाईल. हा फंड गुंतवणूकदारांना बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्रातील संभाव्य विकासाचा फायदा घेण्याची संधी देऊ शकतो. गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील संभाव्य जोखीम आणि शेअर बाजारपेठेतील चढ-उतारदेखील समजून घेणे आवश्यक आहे, असे भांडवलदार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.