अदाणीची अधिकृत भागीदार म्हणून निवड
युनेस्कोचा जागतिक अभियांत्रिकी दिन
अहमदाबाद, ता. ७ : युनेस्को (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना) आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन्स यांनी टिकाऊ विकासासाठी जागतिक अभियांत्रिकी दिन २०२६साठी अदाणी समूहाची अधिकृत भागीदार म्हणून नियुक्ती केली आहे.
स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देणे आणि मोठ्या प्रमाणावर स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणारी वीज उपलब्ध करून देण्याच्या अदाणी समूहाच्या क्षमतेमुळे ही निवड झाली आहे, असे अदाणी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक सागर अदाणी यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर स्वच्छ ऊर्जा ही परवडणारी, शक्तिशाली आणि सर्वसमावेशक असू शकते, हे आम्ही दाखवून देत आहोत. हे जगासाठी भारताचे योगदान आहे, असेही ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले, की कच्छमधील खावडा येथे उभारला जात असलेला आमचा नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प भारताच्या पर्यावरण संरक्षणविषयक कृतीचे प्रतीक आहे. २०२९ पर्यंत ३० गीगावॉट क्षमतेचे लक्ष्य असलेल्या या प्रकल्पाला वर्ल्ड फेडरेशन ऑफ इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन्सने वर्ल्ड इंजिनिअरिंग डे २०२६ कार्यक्रमांतर्गत भारताच्या हरित संक्रमणाचे महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणून सादर केले आहे. त्यावर एक लघुपटही तयार करण्यात आला आहे.
अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खावडा येथे निर्जन आणि राहण्यासाठी अयोग्य अशा जमिनीवर जगातील सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प विकसित करत आहे. ५३८ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेला हा प्रकल्प पॅरिसपेक्षा पाच पट मोठा आणि जवळपास मुंबई शहराइतकाच मोठा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सर्व ऊर्जास्रोतांपैकी क्षमतेच्या दृष्टीने सर्वात मोठ्या ऊर्जा प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे. खावडा प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे १५,२०० हरित रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच सौर पॅनेलसाठी पाण्याविना रोबोटिक स्वच्छता प्रणालीमुळे १,७१ कोटी लिटर पाण्याची बचत होईल आणि सहा कोटी ३६ लाख टन कार्बन उत्सर्जन टाळले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.