मुंबई

कोकण विभागीय आयुक्तांसोबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक; •मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

CD

कास्ट्राइब कर्मचारी महासंघाची बैठक
प्रश्नांवर कोकण विभागीय आयुक्तांसोबत चर्चा

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : ​कास्ट्राइब कर्मचारी महासंघाच्या वतीने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासोबत कोकण भवन येथे शुक्रवारी (ता. ६) विशेष बैठक झाली. महासंघाने डिसेंबर महिन्यात दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन विभागीय आयुक्तांच्या दालनात करण्यात आले होते.

​या बैठकीत प्रामुख्याने एससी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षण, जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा रिक्त असलेला अनुशेष त्वरित भरण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासकीय स्तरावर या मागण्यांची तातडीने दखल घेण्याची विनंती संघटनेतर्फे करण्यात आली.

​३ डिसेंबर १९८०च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना कार्यकारी पदावर नियुक्त्या देणे, अनुकंपा तत्त्वावरील पदभरती प्रक्रिया राबवणे आणि कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बदल्या देणे, अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ जागांवर पात्र व्यक्तींची नेमणूक करणे, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी जागेची तरतूद करणे आणि दुर्गम भागातील मुलांना आधार कार्ड उपलब्ध करून देणे.
​या बैठकीत महासंघाचे सरचिटणीस सुरेश तांबे, कार्याध्यक्ष गणेश मडावी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमीत भुईगळ यांनी मागण्या मांडल्या. तसेच सचिव (दिव्यांग कर्मचारी) शिवाजी बीबराळे, विभागीय अध्यक्ष (शिक्षक संघटना) गाडे, रायगड महासंघाचे संजीव मोरे, जिल्हाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप कदम आणि ठाणे जिल्हा शिक्षक संघटना अध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

जॉनी लिव्हरच्या लेकाला 12व्या झालेला ट्युमर ! पहिली सर्जरी फेल, दुसरी अमेरिकेत; "त्यावेळी फादरच्या रूपात.."

नागपूरला स्फोटाची राजधानी करायची आहे का? एसबीएल कंपनी स्फोटप्रकरणी अद्याप कारवाई नाही, अनिल देशमुख संतापले...

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT