मुंबई

लुप्त होत चाललेल्या डुगाँगसाठी झटणारी संशोधक

CD

लुप्त होत चाललेल्या डुगाँगसाठी झटणारी संशोधक
सागरी परिसंस्थेच्या संवर्धनासाठी डॉ. प्राची हाटकर यांचे महत्त्वपूर्ण काम

मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
जतन आणि संवर्धनाची अद्भुत शक्ती ‘स्त्री’ला लाभलेली आहे. या गुणवैशिष्ट्याच्या आधारावर अनेक स्त्रिया अनेक दशकांपासून संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. आज महिला दिनाच्या निमित्ताने समुद्री जीवशास्त्रज्ञ डॉ. प्राची हाटकर या युवा संशोधकाविषयी जाणून घेणार आहोत. लुप्त होत चाललेल्या डुगाँग या समुद्री गायीसह सागरी जैवविविधतेच्या संवर्धनाचा वसा तिने घेतला आहे.
मुंबईत राहणारी प्राची बालपणी सुट्ट्यांमध्ये पालघरमध्ये केळवे इथे गावी जायची. तिथे समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, शंख-शिंपले गोळा करणे हा तिचा छंद होता. समुद्राच्या सहवासातूनच समुद्रातल्या जीवसृष्टीबद्दल तिला कुतूहल निर्माण झाले. या कुतूहलाला शिक्षणाची जोड देऊन पुढे प्राणीशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर समुद्राची परिसंस्था आणि जैवविविधतेबद्दल अभ्यास करून मासे, समुद्री कासव, इतर सस्तन प्राणी, वनस्पती, प्रवाळ, समुद्रातील सूक्ष्मजीव परिसंस्था, हवामान बदलाचा त्यांच्या जीवनावरील परिणाम आणि संवर्धन या सगळ्या घटकांवर आणि प्रामुख्याने ती डुगाँग या समुद्री गायीवर काही काळपासून संशोधन करत आहे. डुगाँगचा वावर आणि त्याचं भक्ष्य असलेल्या समुद्री गवतांच्या परिसरात तयार झालेल्या समुद्री जीवसंस्थेवरच्या तिच्या संशोधनात्मक प्रबंधासाठी तिला डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.

डुगाँगविषयी माहिती
समुद्री गाय (डुगाँग) एक समुद्रात राहणारा दुर्मिळ, सस्तन जीव असून संपूर्णतः शाकाहारी आहे. तो खोल समुद्रात आढळत असला तरीही किनाऱ्यानजीकच्या समुद्री गवताला खाण्यासाठी तो किनाऱ्यावर येतो. तो जवळपास ३० ते ४० किलो समुद्री गवत खातो. दिसायला थोडाफार डॉल्फिनसारखा; परंतु मागून निमुळता असल्यामुळेच त्याला पहिल्यांदा पाहणारे जलपरी म्हणायचे, असेही प्राची सांगते. कळपाने राहणारा हा प्राणी मानवापासून दूर राहणेच पसंत करतो. तो आकाराने चार मीटर लांब आणि ९०० किलो वजनाचा असतो. मासेमारीसाठीच्या जाळ्यात अडकल्यामुळे, कुरणांची कमतरता, शिकार आणि प्रदूषणामुळे त्यांची संख्या लोप पावली आहे. गुजरातमध्ये कच्छचे आखात, तमिळनाडू आणि अंदमान-निकोबार येथे डुगाँग आढळला आहे. गुजरातमध्ये डुगाँगची संख्या हातावर मोजण्याइतकी आहे. तर तमिळनाडूत काही शे आहे. तर अंदमान-निकोबारमध्ये सर्वात जास्त प्रमाणात डुगाँग आढळतात.

डुगाँगचे महत्त्व
समुद्राच्या उथळ भागातील गवताच्या वाढीला नियंत्रित ठेवणारा डुगाँग समुद्री परिसंस्थेतला एक महत्त्वाचा जीव आहे. स्वसंरक्षणासाठी त्याच्याकडे कोणताही नैसर्गिक गुणधर्म नसल्यामुळे या जीवांना पकडून, त्यांना टॅग लावून मग समुद्रात सोडलं जावं, त्यामुळे त्यांच्या हालचालींचं निरीक्षण करता येऊ शकते, डुगाँगच्या मासेमारीवर नियंत्रणासाठीही ती प्रयत्नशील आहे.

महिलांसाठी आव्हानात्मक क्षेत्र
समुद्री संशोधनामध्ये स्कुबा डायव्हिंगच्या मदतीने केलेला क्षेत्रीय अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. अनेकदा समुद्रकिनारे, बेटं किंवा दुर्गम भागात सर्वेक्षण करावे लागते. हवामान, समुद्रातील परिस्थिती आणि लांब प्रवास हे अनेकदा आव्हानात्मक ठरतात. महिला म्हणून या आव्हानांमध्ये शारीरिक आणि व्यावहारिक मर्यादेचीही भर पडते. काही वेळा दुर्गम बेटांवर दीर्घकाळ संशोधन करावे लागते, अशा परिस्थितीत विशेषतः मासिक पाळीच्या काळात आवश्यक सुविधा उपलब्ध नसणं हे आव्हानात्मक असल्याचे प्राची सांगते; मात्र योग्य नियोजन, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि स्वतःची तयारी यामुळे या अडचणींवर मात करता येते. आज अनेक महिला संशोधक समुद्री विज्ञान आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात योगदान देत आहेत. या क्षेत्रात महिलांनी पुढे यावे, ही काळाची गरज आहे. समुद्राच्या विशाल आणि अद्भुत जगाचा अभ्यास करण्यासाठी तरुणींनी पुढे यावे, अशी अपेक्षाही महिला दिनी डॉ. प्राची व्यक्त करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

तिकिटावरून वाद, आधी शाब्दिक चकमक, नंतर बेदम हाणामारी; चालत्या बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशाचा तुफान राडा, पाहा व्हिडिओ

ई-चालानची कडक कारवाई, पण दंड वसुलीचे काय? १ हजार ३४३ कोटी रुपयांच्या रक्कमेची थकबाकी

Property Tax: मालमत्‍ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेचं मोठं पाऊल; नोटीस जारी, अंतिम मुदत काय?

DigiMHADA App : म्हाडा झालं डिजिटल! कुठेही जायची गरज नाही, 'या' सेवा मिळतील एकाच अ‍ॅपवर

SCROLL FOR NEXT