मुंबई

निवृत्तीनंतरही समाजसेवेची नवी वाट

CD

निवृत्तीनंतरही समाजसेवेची नवी वाट
डोंबिवलीतील अपर्णा पुराणिक यांचे मोफत संस्कृत शिक्षण उपक्रम
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : आयुष्यातील अनेक वर्षे बँकिंग क्षेत्रात जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर अनेक जण शांत निवृत्तीचे आयुष्य स्वीकारतात. मात्र काही जण निवृत्तीनंतरही समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यास घेतात. डोंबिवलीतील निवृत्त बँक व्यवस्थापक अपर्णा सतीश पुराणिक यांचा प्रवास अशाच ध्येयाने प्रेरित आहे. बँकेत तब्बल ३८ वर्षे सेवा केल्यानंतर त्यांनी समाजासाठी मोफत संस्कृत शिक्षणाचा उपक्रम सुरू करून अनेकांना ज्ञानाचा नवा मार्ग दाखवला आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या अपर्णा पुराणिक यांचे बालपण साध्या वातावरणात गेले. लहानपणापासूनच अभ्यासू आणि जिद्दी स्वभावामुळे त्यांनी शिक्षणात सातत्याने प्रगती केली. पुढे त्यांनी बँकिंग क्षेत्राची वाट निवडत पंजाब नॅशनल बँकमध्ये नोकरीला सुरुवात केली. कष्ट, प्रामाणिकपणा आणि कामातील शिस्त यांच्या जोरावर त्यांनी विविध पदांवर काम करीत व्यवस्थापक पदापर्यंत मजल मारली.
बँकेत ३८ वर्षांची सेवा बजावताना त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते, कामातील काटेकोरपणा आणि संघभावना यामुळे सहकारी तसेच ग्राहकांमध्ये त्यांना विशेष मान मिळाला. मात्र सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही समाजाशी नाते जोडून राहण्याची त्यांची इच्छा कायम होती.
याच विचारातून त्यांनी संस्कृत शिक्षणाचा उपक्रम सुरू केला. सध्या त्या डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांना तसेच इतर भागांतील इच्छुकांना ऑनलाइन आणि प्रत्यक्ष वर्गांद्वारे संस्कृत शिकवतात. त्यांच्या वर्गांमध्ये विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी तसेच निवृत्त व्यक्तीही उत्साहाने सहभागी होतात. संस्कृत भाषा कठीण असल्याची भीती दूर करीत त्या अतिशय सोप्या आणि संवादात्मक पद्धतीने धडे शिकवतात. शब्दांच्या अर्थांसोबत त्यामागील सांस्कृतिक संदर्भ, श्लोकांचा अर्थ आणि भाषेची रचना समजावून सांगण्यावर त्या विशेष भर देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ भाषा शिकणेच नव्हे, तर भारतीय परंपरा, विचार आणि संस्कृती यांचीही ओळख होत आहे.

संस्कृतीशी नाते
अपर्णा पुराणिक सांगतात, की संस्कृत ही केवळ एक भाषा नाही, तर आपल्या संस्कृतीचा आधार आहे. आपल्या शास्त्रांपासून साहित्यापर्यंत मुबलक ज्ञानसंपदा या भाषेत आहे. आजच्या पिढीने ती समजून घेतली तर आपली सांस्कृतिक मुळे अधिक मजबूत होतील. त्यांच्या या उपक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. विशेष म्हणजे त्या हे शिक्षण पूर्णपणे मोफत देतात. आर्थिक अडचणीमुळे कोणालाही ज्ञानापासून दूर राहावे लागू नये, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे त्यांच्या वर्गांना समाजातील विविध घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रेरणादायी प्रवास
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील साध्या कुटुंबातून सुरू झालेला प्रवास, बँकिंग क्षेत्रातील नेतृत्वाची जबाबदारी आणि आता संस्कृत शिक्षणाद्वारे समाजसेवेची वाट निवडलेली अपर्णा पुराणिक यांची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

तिकिटावरून वाद, आधी शाब्दिक चकमक, नंतर बेदम हाणामारी; चालत्या बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशाचा तुफान राडा, पाहा व्हिडिओ

ई-चालानची कडक कारवाई, पण दंड वसुलीचे काय? १ हजार ३४३ कोटी रुपयांच्या रक्कमेची थकबाकी

Property Tax: मालमत्‍ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेचं मोठं पाऊल; नोटीस जारी, अंतिम मुदत काय?

DigiMHADA App : म्हाडा झालं डिजिटल! कुठेही जायची गरज नाही, 'या' सेवा मिळतील एकाच अ‍ॅपवर

SCROLL FOR NEXT