मुंबई

कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यासोबत छेडछाड; कर्मचारी निलंबित

CD

सफाई कर्मचाऱ्यासोबत छेडछाड; कर्मचारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात एका महिला सफाई कर्मचाऱ्यासोबत छेडछाड झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ६) समोर आली आहे. रुग्णालयातील एका कायमस्वरूपी कर्मचाऱ्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडित महिलेने रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. आरोपी कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
कंत्राटी पद्धतीने नियुक्त असलेल्या हाउसकीपिंग विभागातील महिला कर्मचाऱ्याला आरोपीने झाडू मागण्याच्या बहाण्याने ब्लड बँकेच्या खोलीत बोलावले. खोलीचे दार बंद करून त्याने तिच्या इच्छेविरुद्ध चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. महिलेने त्याला विरोध करत रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी सांगितले, की पीडितेकडून लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रार मिळताच संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच प्रकरणाची चौकशी रुग्णालयाच्या पाॅश (प्रीव्हेन्शन ऑफ सेक्सुअल हॅरेशमेंट) समितीकडे सोपवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पीडितेच्या आईने सांगितले, की या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनासोबतच स्थानिक पोलिस ठाण्यातही तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रुग्णालय प्रशासनाने सांगितले, की चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोपी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कांदिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण सोनकवडे यांनी सांगितले, की या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

जॉनी लिव्हरच्या लेकाला 12व्या झालेला ट्युमर ! पहिली सर्जरी फेल, दुसरी अमेरिकेत; "त्यावेळी फादरच्या रूपात.."

नागपूरला स्फोटाची राजधानी करायची आहे का? एसबीएल कंपनी स्फोटप्रकरणी अद्याप कारवाई नाही, अनिल देशमुख संतापले...

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT