शताब्दी रुग्णालयाचे खासगीकरण
होणार नाही : महापौर रितू तावडे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : गोवंडी येथील मदन मोहन मालवीय (शताब्दी) रुग्णालयाच्या प्रस्तावित खासगीकरणाबाबत महापौर रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महापालिका (पालिका) प्रशासनाला पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि सुलभ आरोग्यसेवा देणाऱ्या या रुग्णालयाचे खासगीकरण करू नये, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
महापौरांनी प्रशासनाला रुग्णालयाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेची दखल घेण्यास सांगितले आहे. तसेच यासंदर्भात योग्य ती माहिती देऊन गैरसमज दूर करावेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना नियमांनुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, ‘संत गाडगे महाराज एक चळवळ’ या संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नगराळे यांनीही अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे औपचारिक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात रुग्णालय सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत चालवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी नव्याने बांधलेल्या रुग्णालयाच्या इमारतीत लवकरात लवकर उपचार सेवा सुरू कराव्यात, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
शताब्दी रुग्णालय हे परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य केंद्र मानले जाते. त्यामुळे त्याच्या खासगीकरणाच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती; मात्र महापौरांच्या हस्तक्षेपामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून प्रशासनाकडून याबाबत पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.