मुंबईत ‘आयएएपीआय अम्युझमेंट एक्स्पो’
मुंबई, ता. ८ : भारतातील करमणूक आणि पर्यटन उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्याच्या उद्देशाने ‘इंडियन असोसिएशन ऑफ अम्युझमेंट पार्क्स अँड इंडस्ट्रीज’तर्फे १० ते १२ मार्चदरम्यान गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये २४व्या ‘आयएएपीआय अम्युझमेंट एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे.
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने ‘अतुल्य भारत’ मोहिमेअंतर्गत या प्रदर्शनाला पाठबळ दिले आहे. तसेच तेलंगण आणि मध्य प्रदेश ही राज्ये या कार्यक्रमात भागीदार म्हणून सहभागी होत आहेत. या मेळाव्यात भारत, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि चीनसह १० हून अधिक देशांतील २०० पेक्षा जास्त प्रदर्शक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण करणार आहेत. यामध्ये वॉटर पार्क स्लाइड्स, आर्केड गेम्स तसेच विविध डिजिटल आकर्षणांचा समावेश असणार आहे.
यावर्षी ४३ नव्या कंपन्या त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना पहिल्यांदाच या प्रदर्शनातून सादर करणार आहेत. प्रदर्शनादरम्यान ‘आयएसी कनेक्ट’ आणि ‘सुरक्षा परिषद’ यांसारखे विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार असून, त्यामधून उद्योगातील सुरक्षितता आणि भविष्यातील धोरणांवर सविस्तर चर्चा होणार आहे, अशी माहिती आयएएपीआयचे अध्यक्ष अंकुर माहेश्वरी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.