घाटाकोपरमध्ये पाळीव कुत्र्याला मारहाण
केअरटेकरविरुद्ध गुन्हा दाखल; कुत्र्याचा डोळा निकामी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : घाटाकोपरमधील एका प्रसिद्ध पेट शॉपमध्ये देखभालीसाठी ठेवलेल्या कुत्र्याला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत शिहत्झू जातीच्या कुत्र्याचा डावा डोळा पूर्णपणे निकामी झाला आहे. पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी संबंधित कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार धार्मिक जतीन शहा यांचे घाटकोपर पूर्वेकडील गारोडियानगर येथे दुकान आहे. १ मार्चला डॉ. निकुंज शहा यांनी त्यांचे दोन पाळीव कुत्रे देखभालीसाठी या दुकानात ठेवले होते. ३ मार्चला दुकानात कामाला असलेला केअरटेकर मुकेश द्विवेदी हा कुत्र्यांची साफसफाई करीत होता. या वेळी एक कुत्रा त्याच्यावर भुंकला आणि अंगावर धावून आला. याचा राग मनात धरून मुकेशने लाकडी काठीने कुत्र्याला जोरदार मारहाण केली. कुत्र्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात येताच मालकाने तत्काळ त्याला परेल येथील बाई सकरबाई दिनशॉ पेटिट रुग्णालय आणि नंतर दादरमधील विशेष डोळ्यांच्या रुग्णालयात हलवले. दरम्यान, डॉक्टरांनी तपासणीअंती कुत्र्याचा डावा डोळा निकामी झाल्याचे घोषित केले.
सीसीटीव्हीत कैद
संशय आल्याने दुकानाचे मालक धार्मिक शहा यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मुकेश द्विवेदी कुत्र्याला काठीने मारत असल्याचे स्पष्ट दिसले. या घटनेनंतर आरोपी मुकेश द्विवेदी कामावरून पळून गेला. धार्मिक शहा यांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपनिरीक्षक गिरीश हाते या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.