भाजयुमो मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक आझाद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली ही घोषणा करण्यात आली. धारावी ही जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या दीपक सिंह यांनी जमिनी पातळीवरील कार्यकर्ता ते मुंबई अध्यक्ष असा प्रवास आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पूर्ण केला आहे.
दीपक सिंह यांनी एम.बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात धारावीतील वॉर्ड महामंत्रिपदापासून केली होती. त्यानंतर मुंबई युवा मोर्चाचे महामंत्री म्हणून त्यांनी आपली आक्रमक आणि कार्यक्षम प्रतिमा निर्माण केली. संघटनात्मक बांधणीतील त्यांचे कौशल्य, ऊर्जा आणि पक्षनिष्ठ समर्पण पाहून पक्षाने त्यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी पूर्ण निष्ठेने सार्थ ठरवीन. मुंबईतील प्रत्येक युवकापर्यंत भाजपची विचारधारा आणि सरकारच्या जनहितकारी योजना पोहोचवणे, तसेच राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात युवाशक्तीला संघटित करणे हेच माझे मुख्य ध्येय आहे, असे दीपक सिंह यांनी या वेळी नमूद केले. या नियुक्तीमुळे मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात भाजयुमो मुंबई नव्या उंचीवर जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.