मुंबई

शिक्षक भरतीच्या प्रलंबित प्रश्नांवर 10 मार्चला आझाद मैदानात उपोषण

CD

शिक्षक भरतीच्या प्रलंबित प्रश्नांवर
१० मार्चला आझाद मैदानात उपोषण
मुंबई, ता. ८ : पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती २०२५ संदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात येणार असल्याचे शिवयुनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. बालुशा माने यांनी सांगितले. हे आंदोलन १० मार्चला सकाळी १० वाजता आझाद मैदान येथे करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. शिक्षक भरती प्रक्रियेतील विविध प्रश्नांबाबत उमेदवारांनी शासनाकडे वारंवार निवेदने दिली आहेत, मात्र अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नाही. तसेच शासनाकडून वेळोवेळी काढण्यात येणाऱ्या विविध आदेशांमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस उत्तर मिळत नसून, केवळ नवीन परिपत्रके काढली जात असल्याने नाइलाजास्तव उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे मत प्रा. माने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Mumbai: मुंबईत फेरीवाले दिसणं कायमचं बंद होणार, महापालिकेचा कारवाईसाठी आक्रमक पवित्रा

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

अपघातात २ कोटींच्या BMWचा चुराडा, जखमी अवस्थेत अडकून पडले; उद्योगपतीचा मृत्यू, चालक गंभीर

Ishan Kishan Girlfriend: ऑरेंज टँक टॉप, साधी जीन्स; वर्ल्ड कप विजयानंतर ईशान किशनसोबत दिसलेली गर्लफ्रेंड अदिती हुंडिया आहे तरी कोण? Video Viral

SCROLL FOR NEXT