महिलांसाठी मोफत नेत्रतपासणी
डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलची देशव्यापी मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलने देशभरातील महिलांसाठी मोफत नेत्रतपासणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘गिफ्ट हर क्लिअर व्हिजन’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील २८० हून अधिक नेत्र रुग्णालये व व्हिजन केअर सेंटरच्या माध्यमातून सुमारे १० लाख महिलांना मोफत नेत्रतपासणी आणि सल्ला देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या उपक्रमाअंतर्गत लोकांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांसाठी मोफत डोळ्यांची तपासणी करून देण्याची प्रतिज्ञा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक व्यक्ती क्यूआर कोड स्कॅन करून किंवा https://www.dragarwal.com/womens-day-2026/ या संकेतस्थळावरील डिजिटल प्रतिज्ञा फॉर्म भरून सहभागी होऊ शकतात. तसेच ९००३८८८४४४ या क्रमांकावर कॉल करूनही महिलांचे नाव मोफत नेत्र तपासणीसाठी नोंदवता येणार आहे. ८ ते ३१ मार्चदरम्यान जवळच्या डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल केंद्रात मोफत तपासणीसाठी अपॉइंटमेंट निश्चित करण्यात येईल.
डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलचे मुख्य क्लिनिकल अधिकारी आणि वरिष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अश्विन अग्रवाल यांनी सांगितले, की अभ्यासानुसार सुमारे ३५ टक्के भारतीय महिला दृष्टीसंबंधित समस्या असूनही डोळ्यांची तपासणी करण्यास उशीर करतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक-सांस्कृतिक कारणे आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक महिलांना वेळेवर नेत्रसेवा मिळत नाही.
डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल, (मुंबई) येथील क्लिनिकल सर्व्हिसेस प्रमुख डॉ. वंदना जैन यांनी सांगितले, की या मोहिमेद्वारे देशभरातील महिलांना मोफत व्यापक नेत्रतपासणी आणि क्लिनिकल सल्ला दिला जाणार आहे. नियमित आणि वेळेवर नेत्रतपासणी केल्यास टाळता येण्याजोगे दृष्टीदोष रोखणे आणि योग्य उपचार देणे शक्य होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.