मुंबई

समृद्धी महामार्गावर अपघात, मृत्यूंत वाढ

CD

समृद्धी महामार्गावर अपघात, मृत्यूंत वाढ
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर घट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर २०२५मध्ये अपघात आणि मृत्यूंच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मात्र एकूण अपघातांमध्ये किरकोळ घट झाली. महाराष्ट्र महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.
समृद्धी महामार्गावर २०२५मध्ये १८५ अपघात नोंदवले गेले, जे २०२४च्या १३७ अपघातांपेक्षा ३५ टक्के जास्त आहेत. यातील प्राणघातक अपघातांची संख्या ९६ वरून १२८पर्यंत वाढली असून, ३३ टक्के वाढ दर्शविते. मृत्यूंची संख्या १२६ वरून १५२ झाली असून, २१ टक्क्यांची वाढ आहे. नागपूर शहराला मुंबईशी जोडणाऱ्या या ७०० किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन, अंधार, खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचा अभाव आणि चालकांच्या घाईमुळे अपघात वाढत आहेत, असे पोलिसांचे मत आहे. दुसरीकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर २०२५मध्ये एकूण अपघातांमध्ये घट झाली असली तरी किरकोळ अपघात वाढले आहेत. या ९४ किलोमीटर मार्गावर टोल शुल्क वसुली चांगली होत असून, सुरक्षिततेसाठी कॅमेरे आणि पेट्रोलिंग वाढवले आहे. त्याचाही फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

T20 World Cup विजेती टीम इंडिया पुन्हा निळ्या जर्सीत केव्हा दिसणार? जाणून घ्या २०२६ मधील वेळापत्रक; संजू पुन्हा इंग्लंड, किवींना झोडणार

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

SCROLL FOR NEXT