मुंबई ः प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई येथे दोनदिवसीय जिल्हास्तरीय व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम व उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ५ ते ६ मार्च या कालावधीत हे झाले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबईच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ अधिव्याख्याता सुनीता राठोड, कुमार पाटील तसेच विषय साधन मार्गदर्शक अर्चना जोशी यांची उपस्थिती होती. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथून प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी या दोनदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणात कामकाज पाहिले.