मुंबई

गारगाई धरण प्रकल्पाचा खर्च वाढला

CD

गारगाई धरण प्रकल्पाचा खर्च वाढला
स्थायी समितीत आज प्रस्ताव; हजारो झाडे बाधित होण्याची शक्यता
मुंबई, ता. १० : गेल्या १५ वर्षांपासून गारगाई धरण प्रकल्पाची चर्चा सुरू असून, या प्रकल्पाची अंदाजित किंमत ३,००६ कोटी होती. मात्र आता या प्रकल्पाचा खर्च ३,२७६ कोटी इतका दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्पाच्या खर्चात १७१ कोटींनी वाढ झाली आहे, तर विविध करांसह या प्रकल्पाची किंमत ५,३९६ कोटींवर गेली आहे. बुधवारी (ता. ११) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात मुंबईला ४,५०० दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्प राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मागील १५ वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा आहे. मात्र, प्रथमच स्थायी समितीत या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
गारगाई धरण प्रकल्प हा ८४४ हेक्टर जागेवर होणार असून, या धरण प्रकल्पात विविध प्रकारची एकूण तीन लाखांहून अधिक झाडे बाधित होणार आहेत. बाधित होणारी झाडे पाहता तेवढीच नवीन झाडांचे रोपण राज्यातील अन्य जिल्ह्यात केले जाणार असून, त्यासाठी जागा अंतिम होत आहे. गारगाई नदीवर ६९ मीटर उंचीचे आणि ९७९.४ मीटर लांबीचे धरण बांधणे तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशय दरम्यान १.६ किमी लांबीचे जलवहन बोगद्याचे बांधकाम यासह अन्य कामे केली जाणार असून, त्यासाठी एका कंपनीची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी कंपनीकडून एकूण तपशीलवार अंदाजित मूळ रक्कम तीन हजार २७६ कोटी ७५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. २०२० मध्ये स्थायी समितीने दिलेल्या मंजुरीवेळी एकूण प्रकल्प खर्च तीन हजार १०५ कोटी रुपये होता. मात्र, या खर्चात आता वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध कर आणि अन्य कामासहित या प्रकल्पाची एकूण किंमत पाच हजार ३९६ कोटी ४३ लाख रुपयापर्यंत गेला आहे.

बाधितांच्या पुनर्वसनासाठी ५०० कोटी!
या धरण प्रकल्पाच्या कामात प्रकल्पबाधितांचे पुनर्वसनही असून, त्याची किंमत ही ४५० ते ५०० कोटी रुपये आहे. ती यामध्ये नमूद केलेली नाही. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्प खर्च वाढणार आहे. गरगाई धरण बांधण्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार आहेत.

असा होणार प्रकल्प (कोटीत)
कार्यालयीन अंदाजित रक्कम ३,००६
कंत्राटदाराने उद्धृत केलेली रक्कम ३,३३४

वाटाघाटीनंतर अंतिम उद्धृत रक्कम
धरणाचे बांधकाम - १,७७६
अनुषंगिक कामे - १२०
बोगद्याचे काम - ४००
पुनर्वसन व पुनर्स्थापनेचे काम १३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20I World Cup 2026: भारताचा सराव सामन्यात दमदार विजय; राधा-श्रेयंकाच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजने टेकले गुडघे

Thane News: कल्याणमध्ये ऐतिहासिक शिल्पांचा शोध, हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडला

Philippines earthquake: फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप! ३२ जणांचा मृत्यू, दोनशेंपेक्षा अधिक जखमी

Kalyan: कल्याणमध्ये मोठा राडा! टोळक्याकडून रिक्षाचालकाला मारहाण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Visakhapatnam: स्टील प्लांटमध्ये मोठा अपघात! वितळलेलं स्टील कामगारांच्या अंगावर पडलं; ८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT