मुंबई

ॲम्यूझमेंट पार्क उद्योगाला सरकारी सवलती आवश्यक

CD

ॲम्यूझमेंट पार्क उद्योगाला सरकारी सवलती आवश्यक
अध्यक्ष अंकुर महेश्वरी यांचे मत

मुंबई, ता. ११ : भारतातील ॲम्युजमेंट पार्क उद्योग हा सध्या आयात प्रवण असून, निर्यात प्रवण होण्याची त्याच्यात क्षमता असल्याने त्यासाठी सरकारने सवलती द्याव्यात, असे त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष अंकुर महेश्वरी यांनी सकाळला सांगितले.
इंडियन असोसिएशन ऑफ अम्युजमेंट पार्क अँड इंडस्ट्रीजचे २४ वे प्रदर्शन मंगळवार (ता. १०) पासून सुरू झाले असून, यात १५ देशांचे २१० प्रदर्शक सहभागी झाले आहेत. ॲम्युजमेंट पार्क क्षेत्राची भारतीय बाजारपेठ १५ हजार कोटींची असून, ती पाच वर्षांत २५ हजार कोटींची होणार आहे. पुढील वर्षी या अधिवेशनाची व्याप्ती ३० टक्के वाढेल, असेही महेश्वरी म्हणाले. या क्षेत्रातील उपकरणांसाठी भारतीय ॲम्युजमेंट पार्क चालक अजूनही मोठ्या प्रमाणावर आयातीवरच अवलंबून आहेत. मात्र, हा उद्योग भारतात मोठ्या प्रमाणावर वाढला, तर भारत निर्यातदार होईल. त्यासाठी सरकारने अनुदाने, पीआयएल योजना, सवलती दिल्या पाहिजेत. सरकारने या क्षेत्राला गंभीरपणे घ्यावे. सध्या हे क्षेत्र १० लाख प्रत्यक्ष रोजगार देत असून, येत्या पाच वर्षांत आणखीन पाच लाख प्रत्यक्ष रोजगार देण्याची त्याची क्षमता आहे. यातून मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीही होते, असेही त्यांनी दाखवून दिले.

या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि विकास क्षेत्रात गुंतवणूक करावी लागेल. त्याला सरकारने अनुदाने द्यावीत. संघटित क्षेत्रात हे मनोरंजन क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित आहे. असंघटित क्षेत्रात अपघात होत असतात, पण आम्ही सुरक्षा उपाययोजनांचे प्रशिक्षण आमच्या सदस्यांना देतो. सगळ्या राइड्समध्ये ठरलेली मानके पाळली जातात. आमचे सुरक्षाविषयक नियमही असून, ते पाळले तर सुरक्षेचा कुठलाही मुद्दा येणारच नाही. असंघटित क्षेत्राने सुरक्षाविषयक नियम पाळायची गरज आहे, असेही महेश्वरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र, शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला; शेवटी इशाराही दिला

26/11 वेळी 20 गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी ती परिचारिका कोण ? कंगनाने साकारलीय भूमिका

Photos : 1000 वर्षे जुनी प्राचीन शिलालेखांची कलाकृती सापडली; काळाच्या ओघात दडलेला 7व्या- 8व्या शतकाचा इतिहास, फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT