मुंबई

एल्फिन्स्टन पूल बाधितांच्या चाळीच्या दुरुस्ती खर्चाबाबत म्हाडा आग्रही

CD

एल्फिन्स्टन पूलबाधितांच्या चाळीच्या दुरुस्ती खर्चाबाबत म्हाडा आग्रही
एमएमआरडीएला पावणे दोन कोटींचे बिल पाठवणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : एल्फिन्स्टन येथील पुलामुळे बाधित होणाऱ्या दोन उपकरप्राप्त (सेस) चाळींच्या दुरुस्तीवर म्हाडाने याआधी सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याच्या वसुलीसाठी म्हाडा आग्रही आहे. त्यानुसार लवकरच त्याबाबतचे बिल आणि पत्र एमएमआरडीएला दिले जाणार आहे. सदर चाळीचे हक्क आता एमएमआरडीएकडे आले आहेत. त्यामुळे नियमानुसार त्यांनी दुरुस्तीचा खर्च देणे आवश्यक असल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंबई शहरातील जुन्या सेस चाळी आणि इमारतींची देखभाल करण्याची जबाबदारी म्हाडावर आहे. यामध्ये एल्फिन्स्टन पुलाला लागून असलेल्या लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन चाळी सेसमध्ये येत आहेत. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीवर म्हाडाने आतापर्यंत पावणे दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. दरम्यान, सदरच्या चाळी एल्फिन्स्टन पुलाच्या उभारणीमुळे बाधित होत असल्याने येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाकरिता एमएमआरडीएने म्हाडाकडून ७८ घरी घेतली असून, संबंधित रहिवाशांना दिली जाणार आहेत. त्या बदल्यात एमएमआरडीएने म्हाडाला सुमारे ८९ कोटी रुपये दिले आहेत. मात्र, म्हाडाने याआधी सदर चाळींच्या दुरुस्तीवर केलेल्या खर्चाचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याची दखल घेत म्हाडाने जवळपास पावणे दोन कोटी रुपयांच्या वसुलीसाठी एमएमआरडीएकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

म्हाडा म्हणते, नियमानुसार पैसे मिळावेत
उपकरप्राप्त इमारतीच्या दुरुस्तीची जबाबदारी म्हाडावर आहे. त्यानुसार त्यांनी दुरुस्तीवर केलेला खर्च सदर इमारतीचा पुनर्विकास करताना विकसकाकडून वसूल केला जातो. एल्फिन्स्टनच्या राहिवाशांकरिता आम्ही घरे उपलब्ध करून दिली म्हणून त्या बदल्यात एमएमआरडीएने पैसे दिले आहेत. त्यामुळे चाळीतील राहिवाशांचे हक्क आता एमएमआरडीएकडे गेले आहेत. परिणामी चाळीचे हक्कदार एमएमआरडीए झाले आहे. त्यामुळे याआधी आम्ही खर्च केलेले पैसे नियमानुसार एमएमआरडीएने देणे अपेक्षित आहे. चाळीचे आणि त्या जागेचे काय करायचे, हा एमएमआरडीएचा प्रश्न आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT