मुंबई

पदवीधर इंग्रजी येणाऱ्या तरुणांना शिक्षक म्हणून का नेमा : विजय वडेट्टीवार

CD

पदवीधर इंग्रजी येणाऱ्या तरुणांना शिक्षक म्हणून नेमा : विजय वडेट्टीवार
मुंबई, ता. ११ ः ‘राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागांवर निवृत्त झालेल्या बहुसंख्य शिक्षकांना धड इंग्रजी येत नाही. त्यातही त्यांना निवृत्तिवेतन मिळते, त्यांना पुन्हा शाळांमध्ये नेमून बेरोजगार आणि इंग्रजीचे चांगले ज्ञान असलेल्या तरुणांवर अन्याय होत आहे,’ असा सवाल काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी (ता. ११) अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेदरम्यान केला. तसेच इंग्रजीची पदवी, ज्ञान असलेल्या पदवीधरांना कंत्राटी तत्त्वावर का असेना त्यांच्या नेमणुका करा, अशीही मागणी त्यांनी केली.
वडेट्टीवार यांनी राज्यातील शाळांची दुरवस्था आणि शिक्षक भरतीतील सावळ्या गोंधळावर भूमिका मांडली. ग्रामीण भागातील हजारो शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. गळती लागलेल्या शाळा, शुद्ध पाण्याचा अभाव आणि वीज नसलेल्या शाळांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अनेक शाळांमध्ये मुलांसाठी शौचालय नसून शालेय शिक्षण विभागात दप्तर खरेदी आणि निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. दप्तर खरेदी प्रकरणात आधी निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि त्यानंतर प्रशासकीय मान्यता देण्यात आली, हे गंभीर आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. राज्यात आता दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू असताना पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, विद्यार्थ्यांना दप्तर पुरविण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अनागोंदीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : कोट्यवधींचा निधी गेला कुठे? पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

Monsoon Update: कोकण व्यापला; विदर्भातही प्रवेश, अनुकूल हवामानामुळे मॉन्सूनची प्रगती

SCROLL FOR NEXT