मुंबई

सव्वाशे गुंतवणूकदारांना पाच कोटींचा गंडा

CD

सव्वाशे गुंतवणूकदारांना पाच कोटींचा गंडा
महिना पाच टक्के परताव्याचे प्रलोभन

मुंबई, ता. ११ ः गुंतवणुकीवर दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आश्वासन देत श्रमिकांची वस्ती अशी ओळख असलेल्या मानखुर्द परिसरातून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ड्रीम सनशाईन डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि मालक, भागीदारांवर बुधवारी गुन्हा नोंदवण्यात आला. या टोळीने परिसरातील १२५ गुंतवणूकदारांना तब्बल पाच कोटींचा गंडा घातल्याचा आरोप आहे.
खासगी कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या सलमान खान (वय ३१) यांच्या तक्रारीआधारे मानखुर्द पोलिसांनी कंपनीचे मालक अनामत अली अन्सारी, भागीदार रहीम अन्सारी, नवाजीस अन्सारी, नईम सरवर आणि योगिनी शिर्के यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. यातील नईम यांच्या मालकीची चिता कॅम्प परिसरात जीम असून तक्रारदार आणि त्यांची ओळख तेथेच झाली होती. परिचय वाढल्यावर त्यांनी सलमान यांना आपण ड्रिम सनशाईन कंपनीत भागीदार असून ही कंपनी मुख्यत्वे बांधकाम व्यवसाय, खजूर-साखर आयात-निर्यात आणि हवाबंद पाणी उत्पादन व विक्री करते. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना महिना पाच टक्के परतावा देतो, असे सांगितले. ही योजना आकर्षक वाटल्याने सलमान यांनी सुरुवातीला दोन लाख रुपये गुंतवले. त्यानुसार त्यांना महिना १० हजार रुपयांचा परतावा सुरू झाला. त्यामुळे त्यांचा या योजनेवर विश्वास बसला आणि त्यांनी आपल्या नातेवाईक, मित्रपरिवाराला या योजनेबाबत सांगितले. त्यांनीही गुंतवणूक केली; मात्र परतावा बंद होताच साऱ्यांनी कंपनीचे कार्यालय गाठले. ते बंद आढळले. तसेच या सर्वांचे मोबाईलही बंद असल्याने फसवणूक घडल्याची जाणीव सर्वांना झाली. सलमान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या चौकशीत त्यांच्यासह एकूण १२५ जणांनी या कंपनीत सुमारे ५.१३ कोटींची गुंतवणूक केल्याची माहिती पुढे आली.
...
बहुतांश हातावर पोट असणारे
सर्वांच्या वतीने सलमान यांनी प्रातिनिधिक तक्रार केली. त्यात प्रत्येक गुंतवणूकदाराचे नाव, संपर्क क्रमांक आणि गुंतवणूक केलेली रक्कम नमूद केली आहे. त्यानुसार बहुतांश गुंतवणूकदारांचे हातावर पोट असून त्यांनी एक ते पाच लाखांपर्यंत गुंतवणूक केल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामना नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Health Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना शारीरिक व्याधी होतात सगळ्यात कमी; एक सवय बदलून टाकते आयुष्य, जगतात सुखी जीवन

SCROLL FOR NEXT