मुंबई

मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास वाढला; ११ महिन्यांत ३८ लाख प्रवाशांवर कारवाई

CD

विनातिकीट प्रवास वाढला
११ महिन्यांत ३८ लाख प्रवाशांवर रेल्वेची कारवाई
दंडवसुलीत २२ टक्क्यांची वाढ; २२७ कोटींचा महसूल जमा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : रेल्वेची लोकल सेवा जीवनवाहिनी मानली जात असली तरी वाढत्या गर्दीत विनातिकीट व अनियमित प्रवासाचे प्रमाणही वाढल्याचे चित्र समोर आले आहे. मध्य रेल्वेने एप्रिल २०२५ पासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ३७ लाख ९९ हजार मोठ्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून २२७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दररोज सुमारे ७० लाख प्रवासी मुंबई उपनगरी रेल्वेने प्रवास करतात. त्यापैकी ३५ ते ४० लाख प्रवासी मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करतात. या प्रचंड प्रवासी संख्येमध्ये काही जण विनातिकीट किंवा चुकीच्या श्रेणीत प्रवास करत असल्याने वैध तिकीटधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.
मागील आर्थिक वर्षात (एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५) याच कालावधीत ३४.६० लाख विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून १८५.६२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यंदा या संख्येत सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली असून दंडवसुलीत २२ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२६ या एका महिन्यातच ३.६५ लाख विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून २३.२७ कोटी रुपयांची दंड रक्कम जमा झाली आहे.


बनावट तिकीट वापरल्यास कठोर शिक्षा
मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. मोबाईलद्वारे तिकीट खरेदीसाठी ‘रेलवन’ ॲपचा वापर करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. बनावट तिकीट तयार करणे किंवा अशा तिकिटांवर प्रवास करणे हा गंभीर गुन्हा आहे. भारतीय न्याय संहितेनुसार अशा प्रकरणांत दंडासोबत कमाल सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मध्य रेल्वेकडून स्टेशन तपासणी, अँबुश तपासणी, फोर्ट्रेस तपासणी, सखोल तपासणी, तसेच मेगा तिकीट तपासणी अशा विविध पद्धतींचा वापर करून अनधिकृत प्रवासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली.
....

विभागनिहाय कारवाई (एप्रिल २०२५ - फेब्रुवारी २०२६)

विभाग- फुकटे प्रवासी - दंड
• मुंबई विभाग - १६.१६ लाख - ७१.३२ कोटी
• भुसावळ विभाग - ८.९४ लाख - ७५.२९ कोटी
• पुणे विभाग -४.३१ लाख - २७.१४ कोटी दंड
• नागपूर विभाग - ४ लाख - २४.९३ कोटी दंड
• सोलापूर विभाग - २.३० लाख - १०.५३ कोटी दंड
• मुख्यालय -२.२८ लाख - १७.८२ कोटी दंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जय शिवराय! 'या' सिनेमागृहात 'राजा शिवाजी' सिनेमा मोफत पाहता येणार, पहा संपूर्ण यादी

HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

SCROLL FOR NEXT