मुंबई

प्रवेश परीक्षांच्या तारखा निश्चित

CD

प्रवेश परीक्षांच्या तारखा निश्चित

मुंबई, ता. १२ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी सीईटी कक्षाच्या उच्च शिक्षण विभागाच्या एलएलबी (तीनवर्षीय व पाचवर्षीय), बीएड (जनरल व स्पेशल) व बीएड (इएलसीटी), बिपीएड, एमएड, एमपीएड व बीएड+एमएड या सात अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा सीईटी कक्षाने निश्चित करून या प्रवेश परीक्षेच्या अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत.
या सात अभ्यासक्रमांपैकी सहा प्रवेश परीक्षेची प्रवेश नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील एलएलबी (पाचवर्षीय) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची नोंदणी १५ मार्च २०२६ पर्यंत सुरू आहे. २०२६ची पहिली सीईटी २४ मार्चपासून सुरू होत आहे. एमपीएड या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेपासून या वर्षीच्या सीईटी परीक्षेस प्रारंभ होत असून, १७ मेपर्यंत एकूण १७ सीईटी परीक्षा होत आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेशी संबंधित अद्ययावत माहिती, प्रवेश पत्राची माहिती व सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Administrator : ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय, राजकीय मतप्रवाहात; गोकुळच्या दुधात मिठाचा खडा कोणाचा...

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू; संपूर्ण प्रहार संघटनेसह बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

हिंदी मालिकेत झळकणार स्टार प्रवाहची गाजलेली नायिका; साकारणार मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?

Indeed AI : आता मित्र समजून ChatGPT कडे मागा नोकरी! रिमोट जॉब असो किंवा वर्क फ्रॉम होम, सगळंकाही मिळणार एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT