मुंबई

समृद्धीवर ठाकरेंचा पुतळा कधी?

CD

समृद्धीवर ठाकरेंचा पुतळा कधी?
घोषणेनंतरही कारवाई नाही; आठ दिवसांत अहवाल देण्याची सूचना

मुंबई, ता. १५ : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर त्यांच्या भव्य पुतळ्याची घोषणा होऊनही तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा मुद्दा विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधान परिषदेत उपस्थित केला.
यावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी, या विषयाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी याबाबत बोलू शकेन. सन्माननीय सदस्यांना सर्व माहिती घेऊन कळवू, असे सांगितले. या चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हा विषय केवळ एका सदस्यापुरता मर्यादित नसून जनतेशी संबंधित असल्याचे नमूद केले. अधिवेशन सुरू असताना सरकारने आठ दिवसांच्या आत याबाबत सविस्तर लेखी निवेदन सादर करावे, अशी त्यांनी सूचना केली. तसेच समृद्धी महामार्गावर सुरू असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या २२ फूड जॉइंट्सबाबत प्रत्यक्षात सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या २२ ठिकाणांची सकाळी आणि संध्याकाळी स्थिती दर्शवणारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पुढील आठवड्यात सादर करावे, अशीही त्यांनी सूचना केली.

महिला स्वच्छतागृहांची समस्या
महिलांसाठी स्वच्छतागृहांच्या सुविधांबाबतही समस्या कायम असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. मी स्वतः नुकतीच नाशिकला जाऊन आले असून पुन्हा भेट देणार आहे. कागदोपत्री कामे पूर्ण दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात काही ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. सुपरव्हिजनमध्ये काही त्रुटी राहत आहेत का, याची तपासणी करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT