दोघांच्या अवयवदानाने सहा रुग्णांना नवजीवन
मुंबई, ता. १३ : ठाण्यातील दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये झालेल्या अवयवदानामुळे सहा रुग्णांना नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ठाण्यातील किम्स् रुग्णालयात ७० वर्षीय महिलेच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी धाडसी निर्णय घेत अवयवदानास संमती दिली.
झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीच्या माहितीनुसार, त्यांच्या फुप्फुस, लिव्हर आणि दोन्ही किडन्या दान करण्यात आल्या. या अवयवांचे राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गरजू रुग्णांमध्ये प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले असून चार रुग्णांना नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात ६० वर्षीय पुरुषाला मेंदूमृत घोषित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनीही अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या फुप्फुस आणि यकृताचे दान करण्यात आले असून कॉर्नियाही दान करण्यात आले आहे. या अवयवदानामुळे दोन रुग्णांना नवजीवन मिळण्याची शक्यता आहे. २०२६ या वर्षात मुंबईत मृत व्यक्तीकडून झालेले हे १५वे आणि १६वे अवयवदान असल्याची माहिती झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटीने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.