

Maharashtra Latest Marathi News Live Update
esakal
छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या देवळाई तांडा परिसरातील साई टेकडी येथील तलावात शनिवारी सायंकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलांपैकी तीन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, तर दोन मुलांना सुदैवाने जीवदान मिळाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.