मुंबई

ई-रिक्षा, ई-बाईकसाठी परवाना बंधनकारक

CD

ई-रिक्षा, ई-बाइकसाठी परवाना बंधनकारक

मुंबई, ता. १३ : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तथापि, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाइकना यापुढे मोटार वाहन विभागाकडे रीतसर नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
परिवहनमंत्री सरनाईक म्हणाले, की आतापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षांना प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र परमिट घेण्याची सक्ती नव्हती; मात्र वाढत्या ई-वाहनांच्या संख्येचा विचार करता केंद्र शासन अधिसूचनेअन्वये प्रवासी वाहतुकीत एकसमान नियम लागू करण्यासाठी ई-रिक्षा व ई-बाइकसाठीही परमिट (परवाना) प्रक्रिया बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. या निर्णयामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इलेक्ट्रिक रिक्षा या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी समान नियम लागू राहतील. तसेच प्रवासी वाहतुकीच्या व्यवस्थेत पारदर्शकता वाढविणे आणि अनियमितता टाळणे, हा यामागील उद्देश असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले. परमिट प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी परिवहन विभागाकडून एक खिडकी योजना सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Massajog Election: मस्साजोगमध्ये अश्विनी देशमुख यांचा पराभव का झाला? 5 मोठी कारणं; धनंजय देशमुखांची खरंच 'ती' चूक होती?

Prakash Awade Dhairyashil Mane: आवाडे- धैर्यशिल माने संघर्ष पेटणार, प्रकाश आवाडेंच्या वक्तव्यानंतर, भावी आमदार म्हणून माने समर्थकांनी डिवचलं

स्टार प्रवाहवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, प्राजक्ता गायकवाडचं ५ वर्षानंतर कमबॅक, सोबतीला 'ही' अभिनेत्री

Budget Mobile : नवीन मोबाईल घ्या बजेटमध्ये! 20 हजारच्या आत टॉप 5G स्मार्टफोन्स; बेस्ट कॅमेरा, दमदार फीचर्स अन् बरंच काही

आमदारकीसाठी शिंदेंसोबत जाण्याइतका मी नालायक नाही, संधी दिली तर...; विधानपरिषद अन् विलीनीकरणावर बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT