मुंबई

(मुंबई टुडे साठी... सुधारित)मुंबई विद्यापीठातील त्या बंद करण्यात आलेल्या बसला आता बॅटरीवरील व्हेईकलचा पर्याय

CD

विद्यापीठात बॅटरीवरच्या गाड्या धावणार
बंद बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अधिसभा सदस्या डॉ. वंदना महाजन यांचा पुढाकार

मुंबई, ता. १५ : मुंबई विद्यापीठात बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या चालवण्यात येणार असून त्याचा फायदा विद्यार्थी, कर्मचारी व प्राध्यापकांना लाभणार आहे. दरम्यान, कलिना संकुलात येणारी ३१८ क्रमांकाची बससेवा बंद झाल्यानंतर येथील प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता; मात्र मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या डॉ. महाजन यांनी त्याबाबत प्रश्न मांडत ही सेवा पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी केली होती. त्या मागणीवर सखोल विचार करत विद्यापीठात आता बॅटरीवर चालणाऱ्या बससेवा सुरू करण्यात येणार आहेत.
दरम्यान, कलिना संकुलात दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि कर्मचारी ये-जा करतात. विशेषतः बाहेरून प्रवास करून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक उपस्थितीच्या नियमांमुळे वेळेत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असते. बससेवा बंद झाल्यामुळे त्यांना मोठी धावपळ करावी लागत होती. अनेक प्राध्यापकही नियमितपणे बसने प्रवास करतात. त्यामुळे ही बससेवा बंद होणे, ही गंभीर अडचण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पूर्वीप्रमाणे बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रश्नावर उत्तर देताना प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांनी या विषयावर स्वतंत्रपणे सविस्तर उत्तर दिले जाईल, असे सांगत बॅटरीवर चालणारी चार ते पाच गाड्या येत आहेत, असे सांगितले. या गाड्या प्रत्येक प्रवेशद्वारावर उभ्या असतील, असेही ते म्हणाले. तर याच ठिकाणी आपण काही सोलर बाइक सुरू करण्याचा विचार करत असल्याचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी या सभेच्या समारोप भाषणात सांगितले.

दरम्यान, याच बैठकीत मराठी भाषेशी संबंधित एका प्रकल्पाबाबतही डॉ. महाजन यांनी पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला. मराठी भाषा आणि साहित्य क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशा प्रकल्पांमध्ये नेमके कोणते प्राध्यापक कार्यरत आहेत, त्यांच्या निवडीचे निकष काय आहेत आणि प्रकल्पाची अंमलबजावणी कशी होणार आहे, याबाबत माहिती मराठी भाषेच्या अभ्यासकांना उपलब्ध व्हावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. मराठी भाषेशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत किमान माहिती तरी मराठी अभ्यासकांना असावी आणि प्रकल्पांना शासनाचे अनुदान मिळत असल्यास त्यात पारदर्शकता राखली जाणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
याच बैठकीत विभागीय शैक्षणिक स्वायत्ततेचा मुद्दाही डॉ. महाजन यांनी उपस्थित केला. विद्यापीठातील विभागांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी किमान आर्थिक अधिकार विभागांना देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. विभागांना त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी आवश्यक स्वायत्तता पुन्हा बहाल करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले. विभागीय पातळीवर शैक्षणिक कार्यक्रम, परिसंवाद, कार्यशाळा आणि संशोधन उपक्रमांचे नियोजन करताना अनावश्यक प्रशासकीय अडथळे येऊ नयेत, यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच विद्यापीठाची यूडीआरएफ रँकिंग सुधारण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत अशी शैक्षणिक धोरणे राबविण्यात यावीत, अशीही त्यांनी मागणी केली. या सर्व मुद्द्यांमुळे विद्यापीठातील वाहतूक व्यवस्था, शैक्षणिक प्रकल्पांमधील पारदर्शकता आणि विभागीय कार्यक्रमांच्या निर्णयप्रक्रियेबाबत अधिसभेत चर्चा रंगली असून संबंधित विषयांवर विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT