रेबीजविरोधी लशींचा पुरेसा साठा उपलब्ध!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : राज्यातील सरकारी तसेच महापालिका रुग्णालयांमध्ये रेबीजपासून बचावासाठी आवश्यक असलेल्या रेबीजविरोधी लस, सिरम आणि इम्युनोग्लोब्युलिनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली. या औषधांचा पुरवठा नियमितपणे करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेत सरकारी तसेच महापालिका रुग्णालयांमध्ये रेबीजविरोधी लशींची कमतरता असल्याबाबत सदस्य राजहंस सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना आबिटकर यांनी ही माहिती दिली. राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये रेबीजविरोधी लस, सिरम आणि इम्युनोग्लोब्युलिन उपलब्ध असून, त्यासाठी आवश्यक औषधसाठा राखून ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या औषधांचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नियमित खरेदी आणि वितरण व्यवस्था करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. एखाद्या आरोग्य संस्थेकडे जादा साठा असल्यास ‘ई-औषधी’ प्रणालीद्वारे गरज असलेल्या इतर रुग्णालयांना त्या औषधांचा पुरवठा करण्यात येतो. रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगितले जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या राज्यात रेबीजविरोधी लशींच्या एक लाख ५४ हजार ९५७ मात्रा, रेबीजविरोधी इम्युनोग्लोब्युलिनचे ६२ हजार ९६२ आणि रेबीजविरोधी सिरमच्या तीन हजार ६२४ व्हायल्सचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.