एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम
गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात एसटी बँकेने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेत महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले. तसेच गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचा बॅंकेशी काहीही संबंध नसतानाही त्यांची १७ छायाचित्रे वापरली आहेत. यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.
एसटी बँकेवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनेल निवडून आल्यापासून सातत्याने वाद होत आहेत. यापूर्वीही बँकेच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेचे छायाचित्र लावण्यात आल्यावरून वाद झाला होता. दरम्यान, सहकार विभाग आणि रिझर्व्ह बँकेने बँकेच्या कामकाजावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्यातच आता दिनदर्शिकेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासमवेत ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी यांचे छायाचित्र प्रकाशित केले आहे.
==
एसटी बॅंकेच्या दिनदर्शिकेवर मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र छापून त्या आडून ॲड. गुणरत्न सदावर्ते कोट्यवधींचा घोटाळा करत आहेत. बॅंकेचे कर्जवाटप बंद आहे; परंतु कोट्यवधींच्या फर्निचरचे काम चालू आहे. बॅंक बुडीत निघण्याची शक्यता असताना सदावर्ते दाम्पत्याचे फोटोसेशन मात्र जोरदार आहे.
- संदीप शिंदे, अध्यक्ष एसटी कामगार संघटना
===
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केल्याप्रकरणी नथुराम गोडसेला फाशीची शिक्षा झाली होती. नथुरामचे उदात्तीकरण करणाऱ्यास कोणीच शहाणे म्हणणार नाही.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एसटी कर्मचारी काँग्रेस
----
आनंद दिघे विरुद्ध महाराष्ट्र शासन खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने नथुराम गोडसे यांचे विचार प्रसिद्ध करण्यावर बंदी नाही. तसेच जयश्री पाटील यांचे किती छायाचित्र छापावे, हा संस्थेचा विषय आहे. त्यावर मी भाष्य करणार नाही.
- ॲड. गुणरत्न सदावर्ते, वकील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.