मुंबई

बीडीडीवासीयांना नव्या घराची गुढी

CD

बीडीडीवासीयांना नव्या घराची गुढी
रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर; सात-आठ दशकाची कोंडी फुटल्याची भावना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : दोन-तीन पिढ्या बीडीडी चाळीतील १६० चौरस फुटांच्या घरात संसार मांडलेल्या नायगाव बीडीडीवासीयांचे आज (ता. १६) गुढीपाडव्याच्या महूर्तावर पाचशे चौरस फुटांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. गगनचुंबी इमारतीमधील सुसज्ज घराची चावी हाती पडली अन्‌ रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली.
आम्हाला हक्काचे घर मिळाले, आम्ही आनंदी झालो-धन्य झालो, असे शब्द ७०-८० वर्ष वृद्ध लाभार्थ्यांच्या तोंडातून बाहेर पडत होते. निमित्त होते, म्हाडाने नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारलेल्या इमारतीत ८६४ राहिवाशांना घराच्या चावीवाटपाचे.
राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार वरळी बीडीडी चाळीतील ५५६ रहिवाशांना घरांचा ताबा दिलेला असतानाच आज नरिमन पॉइंट येथे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चावीवाटप करण्यात आले.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा मुहूर्त दोन दिवसांवर आलेला असतानाच हातात घराची चावी मिळाल्याने राहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून, गुढीपाडव्याची गुढी नव्या घरातच उभारण्याची भावना व्यक्त केली.

ती माणुसकी राहील का?
बीडीडी चाळीतून आम्ही आता टोलेजंग टॉवरमध्ये जाणार आहोत, याचा खूप आनंद आहे, पण चाळीत जशी शेजारी-पाजारी एकमेकांच्या दुःखात धावून जात होतो. कुणाच्या घरी काय झाले ते तत्काळ कानावर पडत होते, बीडीडी चाळीतील घरांमुळे रहिवाशांमध्ये माणुसकी घट्ट झाली होती, ती या टॉवरमध्ये कायम राहील का, हीच चिंता असल्याची खंत ८० वर्षांच्या शोभा गायकवाड यांनी व्यक्त केली.

माझी आई बीडीडी चाळीत राहत होती. माझा जन्मही याच चाळीत झाला असून, आज मी ८० वर्षांची आहे. वर्षानुवर्षे खुराड्याएवढ्या घरात दिवस काढल्यानेच आज मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आम्ही सर्व कुटुंबीय आनंदी आहोत.
- शोभा गायकवाड, रहिवासी

आम्ही आता सुसज्ज टू बीएचकेच्या घरात जाणार असल्याने समाधानी आहे. या घरासाठी अनेक वर्षे वाट पाहिली, पण सरकारने आणि म्हाडाने अखेर स्वप्न पूर्ण केले.
- बईमा शेख, रहिवासी

आज माझ्या आयुष्याच्या अखेरीस मला हक्काचे घर मिळाले आहे. माझी पत्नी आज हयात नाही, पण तिने खूप खस्ता खाऊन बीडीडीचे घर टिकवले होते. त्यामुळे आज मिळालेल्या या घरामुळे झालेला आनंद मी तिला समर्पित करतो.
- हरिश्चंद्र जाधव, रहिवासी

गेल्या ७४ वर्षांपासून बीडीडी चाळीतील १६० चौरस फुटांच्या लहान घरात राहतोय. याच घरामुळे आता ५०० चौरस फुटांच्या घरात जाणे शक्य झाले आहे. त्यामुळे बीडीडी चाळीला आणि त्या लहान घराला विसरणे शक्य नाही.
- वसंत आठवले, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

SCROLL FOR NEXT