मुंबई

आता वृक्षांची सखाेल आराेग्य तपासणी

CD

आता वृक्षांची सखाेल आराेग्य तपासणी

ॲड. आशीष शेलार; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व झाडांची सखोल आराेग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील आर मध्य आणि एच पश्चिम या भागात पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी दिली.

मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयीन दालनात वृक्ष संवर्धनासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस आमदार संजय उपाध्याय, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबई उपनगरांतील प्रत्येक झाडाचे डिजिटल मॅपिंग, आरोग्य तपासणी आणि व्यवस्थापन करण्याची संपूर्ण प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. याबाबत मंत्री ॲड. शेलार म्हणाले, की यामुळे मुंबई उपनगरांतील सर्व झाडांचे वय, प्रजाती, आरोग्यस्थिती, फांद्यांची वाढ, छाटणीची आवश्यकता तसेच झाडांमुळे होणारे पर्यावरणीय फायदे याची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे.

या प्रक्रियेत लाईडर तंत्रज्ञानाद्वारे झाडांचे थ्री-डी इमेजिंग करून त्यांचे अचूक डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यात येईल. प्रत्येक झाडाचा स्वतंत्र डिजिटल कोड तयार होऊन त्यामध्ये झाडाच्या वाढीची माहिती, कार्बन शोषण क्षमता, प्रदूषण कमी करण्यातील योगदान, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि इतर पर्यावरणीय फायदे नोंदवले जातील. तसेच झाडांच्या आतील स्थितीची तपासणी करण्यासाठी रेझिस्टोग्राफसारखी आधुनिक उपकरणे वापरण्यात येणार आहेत. या उपकरणांच्या सहाय्याने झाड न कापता त्याच्या खोडातील कुजलेला भाग, पोकळी किंवा आतील नुकसान अचूकपणे ओळखता येते. यामुळे झाड सुरक्षित आहे की धोका निर्माण करू शकते, याचा त्वरित निर्णय घेणे शक्य होणार असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
-----
जिल्हा विकास निधीतून खर्च
नव्या डिजिटल प्रणालीमुळे अशा घटनांचे विश्लेषण करणे, झाडांच्या पडण्यामागील कारणे शोधणे तसेच झाडांना विष देण्यात आले आहे का, याबाबत तपास करणेही शक्य होणार आहे. या संपूर्ण प्रणालीअंतर्गत झाडांचा डिजिटल सर्व्हे, आरोग्य तपासणी, निदान, उपचार आणि दुर्घटनांचे विश्लेषण अशी एकात्मिक व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा विकास निधीतून रक्कम खर्च करण्यात येणार आहे, असे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

नवी मुंबईत गॅस वितरण ठप्प, 1500हून अधिक कमर्शियल सिलिंडर पुरवठा बंद; हॉटेल व्यावसायिक अडचणीत

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

SCROLL FOR NEXT