मुंबई

उन्हाळी सुट्ट्यांतील गर्दीसाठी मुंबई-मडगाव विशेष गाड्या

CD

उन्हाळी सुट्ट्यांतील गर्दीसाठी मुंबई-मडगाव विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई-मडगावदरम्यान दोन विशेष साप्ताहिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या १६ एप्रिल ते जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धावणार असून, १७ मार्चपासून त्यांचे आरक्षण सुरू होणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०११७१ सीएसएमटी-मडगाव विशेष गाडी दर बुधवारी मध्यरात्रीनंतर १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटून गुरुवारी दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीची ट्रेन क्रमांक ०११७२ मडगाव-सीएसएमटी मडगावहून गुरुवारी सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता मुंबईत पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
ट्रेन क्रमांक ०१११९ एलटीटी-मडगांव मडगाव विशेष गाडी दर गुरुवारी मध्यरात्रीनंतर १२.५५ वाजता सुटून शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीची ट्रेन क्रमांक ०११२० मडगाव-एलटीटी मडगावहून शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी या स्थानकांवर थांबे असतील. या गाडीत एकूण २१ एलएचबी डबे असून, त्यात प्रथम एसी, द्वितीय एसी, तृतीय एसी, स्लीपर तसेच जनरेटर कारचा समावेश आहे.
...
१७ मार्चपासून आरक्षण
भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर या विशेष गाड्यांचे आरक्षण १७ मार्चपासून सुरू होणार आहे. गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि थांबे रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

Latest Marathi Update: निमंत्रणावरून उपमहापौर- महापौरांमध्ये नाराजीनाट्य

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

SCROLL FOR NEXT