मुंबई

‘अ‍ॅक्टरेक’च्या प्रोटॉन थेरपीचा कर्करुग्णांना दिलासा

CD

‘अ‍ॅक्टरेक’च्या प्रोटॉन थेरपीचा कर्करुग्णांना दिलासा
एकूण ९०० रुग्णांवर उपचार; ४०० हून अधिक लहान मुले
किमान ६० टक्के रुग्णांना मोफत उपचार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः कर्करोग उपचारातील अत्याधुनिक तंत्रज्ञान मानल्या जाणाऱ्या प्रोटॉन थेरपीद्वारे खारघर येथील टाटा मेमोरियलच्या ‘अ‍ॅक्टरेक’ केंद्रात आतापर्यंत सुमारे ९०० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
यापैकी ४०० हून अधिक रुग्ण लहान मुले म्हणजे एकूण रुग्णसंख्येच्या सुमारे ४४ टक्के लहान मुले आहेत. प्रोटॉन थेरपी केंद्र १५ ऑगस्ट २०२३ला सुरू झाले असून कर्करोग उपचारातील ही सुविधा देशात अत्यंत मर्यादित ठिकाणी उपलब्ध असून रुग्णांना तुलनेने कमी दुष्परिणामांसह उपचार मिळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
पत्र संचार कार्यालय (पीआयबी) यांच्या वतीने आयोजित भेटीदरम्यान या प्रोटॉन थेरपी केंद्राची माहिती देण्यात आली. राष्ट्र उभारणीसाठी विविध क्षेत्रांत सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने अशा भेटी आयोजित केल्या जातात.
अ‍ॅक्टरेक येथील प्रोटॉन थेरपी केंद्रात दर महिन्याला सरासरी ७५ ते ७६ रुग्णांवर उपचार केले जातात. प्रत्येक रुग्णाच्या उपचारासाठी साधारण ४० मिनिटे लागतात. प्रोटॉन थेरपी ही रेडिएशन उपचाराची अत्याधुनिक पद्धत आहे. या थेरपीचा उपयोग प्रामुख्याने स्कल बेस, न्यूरो कर्करोग, लहान मुलांमधील कर्करोग, हाडांचे कर्करोग तसेच लिव्हर, पॅनक्रियाज आणि प्रोस्टेट कर्करोग अशा विविध प्रकारच्या कर्करोगांवर उपचारासाठी केला जातो. विशेषतः लहान मुलांमध्ये दीर्घकालीन दुष्परिणाम कमी करण्यासाठी प्रोटॉन थेरपी प्रभावी ठरत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या थेरपीसाठी रुग्णांची प्रतीक्षा यादी असते. रुग्णांसाठी उपचाराचा खर्च ठरलेले असून संस्थेकडून येणाऱ्या रुग्णांना साधारण पाच लाख रुपयांत उपचार केले जातात. तर खासगीसाठी सुमारे १५ लाख रुपये खर्च येतो, असे अ‍ॅक्टरेकचे डॉ. सुब्रमण्यम यांनी सांगितले.
अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या उपचारामुळे देशभरातून कर्करोगग्रस्त रुग्ण खारघर येथील या केंद्राकडे उपचारासाठी येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. टीएमसीचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी अ‍ॅक्टरेक येथील प्रोटॉन थेरपी सेंटर हे टीएमसीच्या सर्व गरजू रुग्णांना, उपचारांसाठी पैसे देण्याची क्षमता विचारात न घेता, अत्याधुनिक कर्करोग उपचार प्रदान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे म्हटले. ही एक अत्याधुनिक सुविधा आहे. या उपचार यंत्रात रुग्णाभोवती ३६० अंशांत हे रोटेशन गॅन्ट्री फिरून पेन्सिल बीम स्कॅनिंग (पीबीएस) तंत्रज्ञानासह इन्टेन्सिटी मॉड्युलेटेड प्रोटॉन थेरपी देत असल्याचे डॉ. सुब्रमण्यम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

SCROLL FOR NEXT