लस न घेतलेल्यांमध्ये
गोवरचे प्रमाण जास्त
आरोग्य विभागाची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईत आढळणारे गोवरचे बहुतेक रुग्ण हे लस न घेतलेली मुले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यंदा गोवंडी आणि धारावी परिसरात आढळलेल्या अनेक मुलांनी गोवरची लस घेतलेली नव्हती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संसर्गजन्य रोगांचे सर्वात मोठे केंद्र असलेल्या महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जानेवारी २०२६ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत गोवरच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्यात आले. या काळात एकूण १०९ रुग्णांना संसर्ग टाळण्यासाठी ‘निगेटिव्ह प्रेशर’ सुविधेने सुसज्ज असलेल्या विशेष विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ५४ रुग्णांना उपचार देण्यात आले. उपचारानंतर रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे आतापर्यंत १०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
---
कस्तुरबा रुग्णालयातील रुग्ण
२०२४ - १०३
२०२५ - ११३
मार्च २०२६ पर्यंत - ६१
----
गोवंडीत तीन मुलांचा मृत्यू
गोवंडी परिसरात दोन कुटुंबांतील तीन लहान मुलांचा २०२२मध्ये गोवरमुळे मृत्यू झाला होता. या मुलांना लस दिली नव्हती, असे तपासात समोर आले. त्यानंतर पालिकेने त्या भागात विशेष लसीकरण मोहीम राबवली होती.
---
प्रमुख लक्षणे
- ताप, सर्दी, खोकला
- डोळे लाल होणे आणि पाणी येणे
- तोंडात पांढरे डाग
- तीन-पाच दिवसांनी शरीरावर लाल पुरळ
- गंभीर प्रकरणांमध्ये निमोनिया, अतिसार, कानाचा संसर्ग आणि मेंदूला सूज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.