मुंबई

पोलिस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे आंदोलन

CD

पोलिस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे आंदोलन
मैदानी चाचणीतील सहभाग नाकारल्याचा आरोप

मुंबई, ता. १७ ः पोलिस भरती प्रक्रियेत सहभागी होऊ न दिल्याने राज्याच्या विविध भागांतून आलेल्या उमेदवारांनी मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राबाहेर मंगळवारी (ता. १७) आंदोलन केले. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला; मात्र पोलिस उपआयुक्त दत्ता नलावडे यांनी हे आरोप फेटाळले. ज्यांना प्रवेश नाकारला त्यांनी प्रवेशद्वारावर गर्दी केली. याबाबत माहिती मिळताच वेळीच हस्तक्षेप करण्यात आला. उमेदवारांशी चर्चा करण्यात आली आणि त्यांची समस्या दूर करण्यात आली. सर्वांना चाचणीसाठी परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मरोळ येथील पोलिस मैदानात मुंबई पोलिस दलाची भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सुरू आहे. मंगळवारी चाचणीचा अखेरचा दिवस होता. पोलिस भरतीत नशीब आजमावणारे हजारो उमेदवार एकाच वेळी दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये अर्ज दाखल करतात. त्यात मुंबईतील पदसंख्या अधिक असल्याने येथे सर्वाधिक अर्ज दाखल होतात. या सर्वांना हॉल तिकीट दिले जाते आणि चाचणीची वेळ कळवली जाते; मात्र ठरलेल्या दिवशी वेळ अपुरा पडल्याने चाचणी न झालेल्या, अन्य जिल्ह्यातील चाचणी आणि मुंबईतील चाचणी एकाच दिवशी आल्याने गैरहजर राहणाऱ्या, वैद्यकीय किंवा अन्य कारणाने अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना मैदानी चाचणी प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाते.

वरील कारणांमुळे ठरलेल्या दिवशी गैरहजर राहिलेल्या उमेदवारांनी अखेरच्या दिवशी मरोळ पोलिस मैदानात गर्दी केली. या गर्दीत राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील तरुणांचा समावेश होता; मात्र ज्यांच्याकडे हाॅल तिकीट होते त्यांनाच आत प्रवेश देण्यात आला. बाकीच्यांना बाहेर काढण्यात आले. मेलद्वारे सातत्याने संपर्कात असूनही मुंबई पोलिसांकडून उत्तर मिळत नव्हते. मंगळवारी मरोळ येथेही नेमकी माहिती मिळत नव्हती. त्यामुळे आंदोलन केल्याची प्रतिक्रिया उमेदवारांकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT