मुंबई

पोलिस शिपायाची आत्महत्या

CD

पोलिस शिपायाची आत्महत्या
प्रेयसीच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा

मुंबई, ता. १७ ः पोलिस दलात नुकतेच भरती झालेले पोलिस शिपाई भय्यासाहेब व्हावळे (३२) यांनी रविवारी (ता. १५) कलिना प्रशिक्षण केंद्रात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार वाकोला पोलिसांनी प्रेयसीच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भय्यासाहेब मूळचे परभणीचे आहेत. नुकतेच ते पोलिस दलात चालक म्हणून भरती झाले होते. कलिना येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. रविवारी (ता. १५) सकाळी ते प्रशिक्षण केंद्रात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांना त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी जालना जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणीवर दीड ते दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते; मात्र तिच्या पालकांना हे मान्य नव्हते. त्यांनी नोकरी घालवू, आपल्यासह पालकांना जीवे ठार मारण्याच्या वारंवार धमक्या दिल्याचे नमूद केले होते. त्याआधारे पोलिसांनी प्रेयसीच्या पालकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT