मुंबई

महापौर निवासस्थानाच्या दुरुस्तीबाबत माझी कोणतीही मागणी नाही; महापौर रितू तावडे यांचे स्पष्टीकरण

CD

निवासस्थान दुरुस्तीबाबत मागणी नाही
महापौर रितू तावडे यांचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १७ : भायखळा येथील महापौर निवासस्थानाच्या दुरुस्तीवरून सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘‘महापौर निवासस्थानाच्या दुरुस्तीबाबत मी महापालिका प्रशासनाकडे कोणतीही वैयक्तिक किंवा स्वतंत्र मागणी केलेली नाही,’’ असे त्यांनी अधिकृतपणे स्पष्ट केले आहे.

महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, महापौर निवासस्थान ही महापालिकेची मालमत्ता आहे. या मालमत्तेची देखभाल करणे किंवा आवश्यक दुरुस्तीचे निर्णय घेणे ही महापालिका प्रशासनाची नियमित प्रक्रिया आहे. संबंधित विभागाकडून त्यांच्या नियमानुसार ही कामे केली जातात. या प्रशासकीय प्रक्रियेशी माझा कोणताही संबंध जोडला जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महापौर म्हणाल्या की, ‘‘मी आजही घाटकोपर येथील माझ्या मूळ निवासस्थानीच वास्तव्यास आहे. तिथूनच माझे दैनंदिन कामकाज सुरू आहे. त्यामुळे भायखळ्यातील निवासस्थानाच्या दुरुस्तीबाबत माझ्याकडून कोणतेही विशेष निर्देश देण्यात आलेले नाहीत.’’ ​महापालिका प्रशासनाकडून महापौरांना अधिकृत निवासस्थान पुरवण्यात येते. मात्र, सध्याच्या दुरुस्तीच्या कामावरून होणाऱ्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे महापौरांच्या या स्पष्टीकरणामुळे आता स्पष्ट झाले आहे.
.....

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

Dapoli News : कोकण दीपकाडीला जागतिक व्यासपीठ; संवर्धनासाठी जनतेला मतदानाचे आवाहन

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

SCROLL FOR NEXT