मुंबई

सोमालियातील बालिकेला मुंबईत नवी दृष्टी

CD

सोमालियातील बालिकेला मुंबईत नवी दृष्टी
कॉर्निया प्रत्यारोपण टाळत दुर्मिळ आजारावर मात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : केराटोकोनस या दुर्मिळ नेत्ररोगाने त्रस्त असलेल्या सोमालियातील ११ वर्षीय बालिकेवर मुंबईत यशस्वी उपचार करण्यात आले असून, तिची दृष्टी लक्षणीयरीत्या सुधारली आहे. विशेष म्हणजे कॉर्निया प्रत्यारोपण न करता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा उपचार करण्यात आला.
या बालिकेला गेल्या काही वर्षांपासून कमी दिसण्याची समस्या होती. एका डोळ्याचा चष्म्याचा नंबर १८ तर दुसऱ्याचा २२ असूनही दृष्टी सुधारत नव्हती. सोमालिया तसेच मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार करूनही समाधानकारक परिणाम न मिळाल्याने अखेर तिला मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर तिला केराटोकोनस हा आजार असल्याचे स्पष्ट झाले.
डॉक्टरांनी बालिकेची स्थिती लक्षात घेऊन कॉर्निया प्रत्यारोपण टाळत कॉर्नियल अलोजेनिक इंट्रास्ट्रोमल रिंग सेगमेंट आणि कॉर्नियल क्रॉस-लिंकिंग या दोन आधुनिक तंत्रांचा वापर केला. या प्रक्रियेद्वारे कॉर्नियाचा आकार स्थिर ठेवून त्याला अधिक मजबूत करण्यात आले. यामुळे आजाराची प्रगती रोखता आली. या उपचारानंतर बालिकेच्या दृष्टीत लक्षणीय सुधार दिसून आला असून, ती पूर्वीपेक्षा स्पष्ट पाहू शकत आहे.
तज्ज्ञांच्या मते, केराटोकोनस हा असा आजार आहे ज्यामध्ये कॉर्निया हळूहळू पातळ होत शंकूसारखा आकार घेतो आणि त्यामुळे दृष्टी कमी होत जाते. वेळेवर उपचार न झाल्यास अनेकदा कॉर्निया प्रत्यारोपणाची गरज भासते. मात्र या प्रकरणात आधुनिक उपचारपद्धतींच्या सहाय्याने प्रत्यारोपणाची गरज टाळण्यात यश आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : राजकोटच्या काही भागांत मुसळधार पाऊस

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT