आयएमएच्या नवीन सदस्यत्वासाठी शुल्कात २५ टक्के सवलत
आयएमए महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे विशेष सदस्य नोंदणी मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य शाखेने राजभरातील डॉक्टरांसाठी विशेष सदस्य नोंदणी मोहीम जाहीर केली आहे. या मोहिमेतंर्गत १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत नवीन सदस्य होणाऱ्या डॉक्टरांना सदस्यत्व शुल्कात २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. नॅशनल प्रेसिडेंटच्या सूचनेनुसार, मुख्यालयाचा वाटा २५ टक्क्यांनी कमी करण्यात आला असून, महाराष्ट्र राज्य शाखेनेही आपल्या वाट्यातून २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डॉक्टरांना सवलतीच्या दरात आयएमएचे कायमस्वरूपी सदस्य होता येणार आहे.
सदस्यत्वाचे सुधारित शुल्क
या मोहिमेतंर्गत सभासदांना दोन स्वतंत्र धनादेशांद्वारे शुल्क भरावे लागणार आहे. राज्य शाखेसाठीचे सुधारित शुल्क देण्यात आले आहे. त्यानुसार सदस्यत्व प्रकार राज्य शाखेचा धनादेश जीएसटी सह आजीवन सदस्यत्व १०,०५४ रुपये, दाम्पत्य आजीवन सदस्यत्व १६,५७१ रुपये, हाफ कपल लाइफ मेंबरशिप ६,१०७ रुपये असे देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, दुसरा धनादेश संबंधित स्थानिक शाखेच्या नावे द्यावा लागेल, ज्याचे शुल्क त्या त्या शाखेच्या नियमानुसार निश्चित राहणार आहे.
नोंदणीसाठी महत्त्वाच्या अटी
* अंतिम मुदत : सवलतीचा लाभ घेण्यासाठी अर्ज ३० एप्रिल २०२६ पर्यंत पोहोचणे अनिवार्य आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांना सवलत लागू होणार नाही.
* अनिवार्य माहिती : अर्जासोबत ई-मेल आयडी, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड क्रमांक देणे बंधनकारक आहे. या माहितीशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
* अर्जदारांनी आपले अर्ज स्थानिक शाखेच्या अध्यक्ष किंवा सचिवांच्या स्वाक्षरी आणि शिक्क्यासह जमा करायचे आहेत. * आयएमए महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉ. विक्रांत देसाई आणि कोषाध्यक्ष डॉ. अमोल गिट्टे यांनी जास्तीत जास्त डॉक्टरांनी या संधीचा लाभ घेऊन संघटनेचे बळ वाढवावे, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.