मुंबई

मुंबईसाठी महिलांचे योगदान मोठे

CD

मुंबईसाठी महिलांचे योगदान मोठे
महापौर रितू तावडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १८ : ‘मुंबई कधीच झोपत नाही आणि हे महानगर अखंडपणे धावण्यामागे महिलाशक्तीचे मोठे योगदान आहे. घराबाहेर पडून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या महिला असोत किंवा घर सांभाळणाऱ्या गृहिणी, प्रत्येकीचा गौरव होणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन महापौर रितू तावडे यांनी बुधवारी (ता. १८) केले.

महापालिकेच्या वतीने आयोजित ‘सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार २०२६’ सोहळा भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान (राणी बाग) मधील पेंग्विन सभागृहात पार पडला. या वेळी विविध विभागांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला व पुरुष अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी महापौर म्हणाल्या, की​क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या धैर्यामुळेच आज महिला सर्वच क्षेत्रांत नेतृत्व करीत आहेत. स्त्री केवळ समाज घडवत नाही तर संधी मिळाली तर ती इतिहासही घडवू शकते. त्यातच पालिकेच्या स्त्री संसाधन केंद्रामार्फत पीडित महिलांना कायदेशीर, मानसिक आणि वैद्यकीय मदत देण्यासाठी विशेष कार्यप्रणाली राबविली जात आहे. ​या वेळी डॉ. मनीषा भारती, डॉ. शीतल राऊत, सुनील जांगळे, स्वाती दांगट, पुरुषोत्तम संदिकर, विजय जाधव, वंदना सिंह, रोहिणी नाईक आणि स्नेहा खांडेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल गौरविण्यात आले. या कार्यक्रमात उपआयुक्त चंदा जाधव यांनी स्त्री संसाधन केंद्राच्या उपक्रमांची माहिती दिली.

..
​शिक्षण प्रगतीचे साधन
अतिरिक्त महापालिका आयुक्त ​डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले, की महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये, सवलती न मागता आपल्या कर्तृत्वातून त्यांनी स्वतःला सिद्ध केले पाहिजे. तर प्रधान आयकर आयुक्त ​डॉ. पल्लवी दराडे म्हणाल्या, की शिक्षण हे प्रगतीचे साधन आहे. प्रत्येक स्त्रीने निरंतर ज्ञान मिळवून गरजू महिलांना मदत करण्याचा निर्धार करावा. ​पद्मश्री डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांनी महिलांमध्ये जग बदलण्याची शक्ती आहे. समाज तेव्हाच प्रगत होईल जेव्हा नारीशक्ती सशक्त आणि सुरक्षित असेल, असे मत व्यक्त केले.

.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT