मुंबई

‘नायर’च्या नर्सिंग विद्यार्थिनींची अधीक्षिकेकडून फसवणूक?

CD

‘नायर’च्या नर्सिंग विद्यार्थिनींची
अधीक्षिकेकडून फसवणूक?

‘टीएनएआय’च्या अध्यक्षांची पालिका आयुक्तांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : नायर स्कूल ऑफ नर्सिंगमधून परिचारिकेचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या जवळपास ७७ विद्यार्थिनींची नायर रुग्णालयातील प्रभारी अधीक्षिका रुचा साळगावकर यांनी फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाचे (टीएनएआय) सभासद बनविण्यासाठी विद्यार्थिनींकडून प्रत्येकी २,२०० रुपये शुल्क घेऊन लाखाे रुपयांचा अपहार केल्याचा आराेप करण्यात आला आहे. यासंदर्भात ‘टीएनएआय’च्या अध्यक्षांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. दरम्यान, संस्थेची सर्व रक्कम जमा केल्याचे सांगून साळगावकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

असोसिएशनच्या वतीने २०१३ ते २०१७दरम्यान विविध बॅचमधील विद्यार्थ्यांकडून सुमारे आठ लाख आठ हजार रुपये गोळा करण्यात आले. ही रक्कम संस्थेकडे जमा न करता रुचा साळगावकर यांनी दीर्घकाळ स्वतःकडे ठेवण्यात आल्याचा दावा तक्रारदार आणि संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ राठोड यांनी तक्रारीत केला आहे. याप्रकरणी यापूर्वी ८ जून २०२१ला परळ येथील टाटा रुग्णालयात समितीमार्फत चौकशी करण्यात आली होती. त्या वेळी साळगावकर यांनी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचे मान्य करून १८ जून २०२१पर्यंत रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले हाेते, असे तक्रारीत नमूद आहे. काही रक्कम जमाही केली; मात्र अजूनही ७७ विद्यार्थ्यांचे सुमारे दाेन लाख २८ हजार रुपये जमा झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मार्च २०२६ मध्ये साळगावकर सेवानिवृत्त होत असल्याचे राठोड यांनी सांगितले. ट्रेड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र शाखेने पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग, एफ दक्षिण विशेष कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना लेखी स्वरूपात विद्यार्थ्यांच्या नावाच्या यादीसह तक्रार नोंदवण्यात आली आहे; मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT