मुंबई

अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ

CD

अंशकालीन स्त्री परिचरांच्या
मानधनात दुप्पट वाढ
आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. १ एप्रिल २०२६पासून मानधनात वाढ लागू करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर गाव पातळीवर, आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागात प्राथमिक स्वरूपाच्या आरोग्यसेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. तसेच आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहाेचवण्यातही अंशकालीन स्त्री परिचर महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या कामाचे स्वरूप पाहता त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व संघटनांकडून होत होती. या परिचरांना २०१९ च्या शासन निर्णयानुसार दरमहा तीन हजार रुपये मानधन अदा करण्यात येत होते. स्त्री परिचरांच्या कामाचे बदलते स्वरूप, आरोग्यसेवेतील वाढती भूमिका आणि वाढत्या महागाईचा विचार करता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घेऊन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात तीन हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व जिल्हा परिषदांनी अंशकालीन स्त्री परिचरांना प्रचलित कार्यपद्धतीनुसार सुधारित मासिक मानधन देण्याची कार्यवाही करावी. तसेच दरमहा १० तारखेपर्यंत मासिक मानधनाची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करावी. याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील अंशकालीन स्त्री परिचरांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : घनसावंगी तालुक्यात ढगाळ वातावरण

Pune News : मध्य रेल्वेत चोरीचा सुळसुळाट; १६ दिवसांत मोबाईल व मंगळसूत्र चोरी

'ढोंगी साध्वी' ना भगवे कपडे ना गळ्यात कोणत्या माळा, संन्सास घेणारी ममता कुलकर्णी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये Viral Video

SCROLL FOR NEXT