मुंबई

स्वयंचलित दरवाजांची साधी लोकल लवकरच

CD

स्वयंचलित दरवाजांची
साधी लोकल लवकरच

मुंबईत धोकादायक प्रवासाला आळा; प्रवासी सुरक्षेसाठी रेल्वेचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : दररोज लोकलच्या दरवाजात लाेंबकळून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर स्वयंचलित दरवाजांची सुविधा असलेली पहिली नॉन-एसी (साधी) लोकल लवकरच मुंबईच्या रुळांवर धावणार आहे. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

काही महिन्यांपूर्वी मुंब्रा परिसरात घडलेल्या अपघातानंतर लोकलच्या दरवाजावर लाेंबकळून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. या घटनेनंतर रेल्वे प्रशासन, प्रवासी संघटना आणि तज्ज्ञांत मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर रेल्वे बोर्डानेही गंभीर दखल घेऊन उपनगरी लोकलमधील सुरक्षित प्रवासाच्या दृष्‍टीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले होते. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलेली अत्याधुनिक पहिली स्वयंचलित दरवाजे असलेली साधी लोकल लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विविध तांत्रिक तसेच सुरक्षा चाचण्या घेण्यात येणार असून, त्या यशस्वी झाल्यानंतर ही लोकल नियमित प्रवासी सेवेत दाखल हाेणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर चालवल्यानंतर टप्प्याटप्प्याने उपनगरी रेल्वेसेवेत समाविष्ट करण्यात येणार आहे.


उघड्या दरवाजांच्या समस्येवर उपाय
लोकलमध्ये दरवाजात उभे राहणे, धावत्या गाडीत चढणे किंवा उतरणे यामुळे दरवर्षी अनेक गंभीर अपघात होतात. अतिगर्दीमुळे अनेकांना दरवाजात उभे राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. ही बाब लक्षात घेऊन नव्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहेत. या यंत्रणेनुसार गाडी सुरू होण्यापूर्वी दरवाजे आपोआप बंद होतील आणि स्थानकावर पूर्ण थांबल्यानंतरच उघडतील. तसेच दरवाजे व्यवस्थित बंद नसतील, तर गाडी सुरू होणार नाही, अशी अतिरिक्त सुरक्षा प्रणाली बसविण्यात आली आहे.

हवा खेळती राहण्यासाठी विशेष उपाय
नॉन-एसी लोकलमध्ये दरवाजे बंद ठेवल्यास गुदमरल्यासारखे होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वेने डब्यांच्या रचनेत विशेष बदल केले आहेत. सुधारित व्हेंटिलेशन प्रणाली, मोठ्या खिडक्या, छतावरील हवेचा प्रवाह वाढविणारी यंत्रणा तसेच नैसर्गिक हवा खेळती राहील, अशी रचना करण्यात आली आहे.

डब्यांमध्ये अंतर्गत जोडणी
लोकलचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डब्यांदरम्यान असलेली व्हेस्टिब्युल कनेक्टिव्हिटी. त्यामुळे प्रवाशांना एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाता येणार आहे. गर्दी आणि आपत्कालीन परिस्थितीतही ही सुविधा उपयोगी ठरणार आहे.
-------
ठळक वैशिष्ट्ये
- स्वयंचलित उघड-बंद होणारे दरवाजे
- सुधारित व्हेंटिलेशन प्रणाली
- डब्यांमधील अंतर्गत जोडणी (व्हेस्टिब्युल)
- आधुनिक सुरक्षा यंत्रणा
- आपत्कालीन सुविधा
- अपघात टाळण्यासाठी विशेष रचना
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : घनसावंगी तालुक्यात ढगाळ वातावरण

SCROLL FOR NEXT