थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Tamilnadu Election Result Updates तामिळनाडूत मोठा पक्ष ठरला असला तरी टीव्हीके बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. तामिळनाडुत २३४ जागा असून सत्तास्थापनेसाठी ११८ जागांची आवश्यकता आहे.
Vijay Party Leads but No Majority in Tamil Nadu

Vijay Party Leads but No Majority in Tamil Nadu

Esakal

Updated on

तामिळनाडूत अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाने डीएमके आणि एआयडीएमके या दोन्ही पक्षांना धक्का देत पदार्पणातच सर्वाधिक जागा जिंकल्या. तामिळनाडुत अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या थलपती विजयच्या पक्षाने मोठं यश मिळवलंय. तामिळनाडूत मोठा पक्ष ठरला असला तरी टीव्हीके बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. तामिळनाडुत २३४ जागा असून सत्तास्थापनेसाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार टीव्हीकेला सर्वाधिक १०७ जागांवर निर्णायक आघाडी आहे. तर डीएमके ६० आणि एआयडीएमकेला ४७ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस ५, पीएमके ४, आययुएए, सीपीआय, सीपीआयएम आणि व्हिसीके या पक्षांना प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला केवळ एकच जागा जिंकता आलीय. राज्यात त्रिशंकू सत्तेची स्थिती निर्माण झालीय. टीव्हीके पक्षाला आता इतर कोणत्या तरी पक्षाशी हातमिळवणी करावी लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com