मुंबई विद्यापीठात
आज व्याख्यान
मुंबई, ता. १९ : मुंबई विद्यापीठ आणि आयर्लंडच्या वाणिज्य दूतावासाच्या वतीने विद्यापीठात ‘आयर्लंडच्या विकास प्रवासात युरोपियन युनियनची सकारात्मक भूमिका’ या विषयावर शुक्रवारी (ता. २०) दुपारी २ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित या व्याख्यानासाठी आयर्लंडचे अटर्नी जनरल रोसा फॅनिंग एस.सी. हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. युरोपियन युनियनने आयर्लंडच्या आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक विकासात बजावलेली भूमिका याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई विद्यापीठ आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्यासाठी सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करत असून, या व्याख्यानाद्वारे भारत-आयर्लंड शैक्षणिक व धोरणात्मक संबंध अधिक दृढ होण्यास हातभार लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.