मुंबई

कोठडीतील मृत्यू हदयविकाराने!

CD

कोठडीतील मृत्यू हृदयविकाराने!
वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस दोषमुक्त

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : वडाळा पोलिसांच्या ताब्यातील विजय सिंह (वय २६) या तरुणाचा पोलिस कोठडीतील कथित मृत्यू हा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा सीबीआयचा निष्कर्ष उच्च न्यायालयाने नुकताच मान्य केला. तसेच पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याच्या आरोपांप्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांना दोषमुक्त केले.
सहा वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात विजयचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. याचिकाकर्त्यांच्या आरोपांना ठोस पुराव्यांचा अभाव आहे. वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुरावे विजयचा मृत्यू स्पष्टपणे हृदयविकारामुळे झाल्याचे दर्शवतात. तसेच केवळ संशय किंवा आरोपांच्या आधारे पोलिसांनी गुन्हा केल्याचे म्हणता येणार नाही, असे निरीक्षणही न्या. भारती डांगरे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने विजय याच्या वडिलांची याचिका फेटाळताना निरीक्षण नोंदवले. साक्षीदारांचे जबाब, शवविच्छेदन अहवाल, तसेच केईएम, जे. जे. रुग्णालय आणि एम्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतांचा विचार करून सीबीआयने पोलिसांविरोधात गुन्हा सिद्ध होत नसल्याचे अहवालात नमूद केले होते. त्यामुळे मृत्यू मारहाणीत नव्हे; तर अचानक आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे नमूद करणारा सीबीआयचा अंतिम अहवालही न्यायालयाने स्वीकारला.
...
प्रकरण काय?
एमएमआरडीए कपांउंड येथे २७ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री दोन गटांत वाद झाल्यावर वडाळा टी. टी. पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने विजयला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हाही दाखल केला. विजयच्या अचानक छातीत दुखायला लागल्याने त्याला तत्काळ शीव रुग्णालयात दाखल केले गेले; परंतु त्याला डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच मृत घोषित केल्याचा पोलिसांचा दावा होता. दुसरीकडे विजयचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा करून पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये मनसे कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT