मुंबई

जखमी वानराची ठाण्यातून सुटका

CD

जखमी वानराची ठाण्यातून सुटका
​मुंबई, ता. २० : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमावर्ती भागात एका वानराची (बोनेट मॅकॉक) धनुष्यबाणाने शिकार करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. या वानराच्या कमरेच्या भागात बाण आरपार घुसल्याने गंभीर जखमी झालेल्या या वानराला ‘रॉ’ आणि वन विभागाच्या पथकाने तातडीने रेस्क्यू केले.

ठाण्यातील राष्ट्रीय उद्यानालगतच्या परिसरात एका झाडावर वानर गंभीर जखमी अवस्थेत बसल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्याच्या कमरेच्या भागात एक बाण आरपार घुसलेला होता. नागरिकांनी तातडीने वन विभागाच्या हेल्पलाइनवर आणि ‘रॉ’ या (रेस्किंग असोसिएशन फॉर वाइल्ड लाइफ वेल्फेअर) संस्थेला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत वानराला सुरक्षितपणे खाली उतरवले. या वानराला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. या वानराची प्रकृती चिंताजनक असून, ‘रॉ’च्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली या जखमी वानरावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेला बाण हा अत्यंत व्यावसायिक दर्जाचा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ खोडसाळपणा नसून नियोजनबद्ध शिकारीचा प्रयत्न असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! मुंबई लोकलच्या 'या' रेल्वे स्टेशनवर 'स्लीपिंग पॉड्स' सुरू होणार; काही तासांसाठी आरामाची खात्री

देशमुखांच्या घरी असा साजरा होतो गुढी पाडवा; सुनबाई जिनिलियाने सांगितली परंपरा, म्हणाली, 'जेवणाला इतके पदार्थ...

Latest Marathi News Live Update :शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला, अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा भुईसपाट

अवकाळी पावसाचा करमाडला तडाखा; शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला

Panvel: स्नेहल ढमाले कोणत्या बाकावर? पनवेलच्या राजकारणात उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT