मुंबई

लहान रुग्णालयांत आयसीयू सुविधा

CD

लहान रुग्णालयांत आयसीयू सुविधा
१० हजारांहून अधिक पदे रिक्त; भरती प्रक्रियेला वेग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबई महापालिकेच्या लहान रुग्णालयांमध्ये आयसीयूसह अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी निर्देश देण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिले. बुधवारी लक्षवेधी सूचनेद्वारे भाजपचे आमदार राजहंस सिंह यांनी महापालिका रुग्णालयांतील डॉक्टर व परिचारिका यांच्या रिक्त पदांचा प्रश्न तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची गरज मांडली. यावर शिवसेनेेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सचिन अहिर आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही प्रश्न उपस्थित केले.
या चर्चेला उत्तर देताना सामंत यांनी सांगितले, की महानगरातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेला सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना सीएसआर निधी थेट वापरण्याचे अधिकार देण्यात येतील. यामुळे प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया टाळली जाईल. तसेच केईएम, सायन, नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमध्ये पुढील सहा महिन्यांत अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये एकूण ३१ हजार ७३२ पदे मंजूर असून, त्यापैकी २१ हजार २९९ पदे भरलेली आहेत, तर १० हजार ४३३ पदे रिक्त आहेत. यापैकी पाच हजार ५७९ पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या चार हजार ८५४ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत महापालिकेची चार मोठी रुग्णालये, उपनगरांमध्ये १६ रुग्णालये आणि पाच विशेष रुग्णालये आहेत. तसेच २३६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २२९ आपले दवाखाने, १८८ दवाखाने, २६ प्रसूतिगृहे आणि ३३ बहुविशेषता दवाखाने कार्यरत आहेत. दरम्यान, पूर्व उपनगरांत मोठ्या रुग्णालयाची गरज असल्याचे मत ही या वेळी व्यक्त करण्यात आले. मुलुंड, भांडुप किंवा घाटकोपर परिसरात केईएम किंवा नायरसारखे मोठे रुग्णालय उभारण्याची मागणी त्यांनी केली. यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT