पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचा १० हजार कोटी महसुलाचा टप्पा पार
गुढीपाडव्याच्या विक्रीत ३८ टक्के वाढ
मुंबई, ता. २२ : पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लि.ने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १० हजार कोटी रुपयांच्या महसुलाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून, गेल्यावर्षीच्या गुढीपाडव्याच्या तुलनेत कालच्या गुढीपाडव्याला त्यांच्या विक्रीत ३८ टक्के वाढ झाली.
गुढीपाडव्याला त्यांची १७० कोटी ७० लाख रुपयांची विक्री झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ३८ टक्क्यांची भरीव वाढ झाली आहे. या विक्रीमध्ये सोन्याच्या दागिन्यांचा वाटा प्रमुख असून, त्यात ३५ टक्क्यांची वाढ झाली. हिरे आणि चांदीच्या विक्रीने अनुक्रमे ६१ टक्के आणि ११८ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ याबाबत म्हणाले की, सोन्याचे भाव वाढलेले असूनही यावर्षी गुढीपाडव्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे १७०.७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. ही कामगिरी आमच्या ब्रँडची ताकद आणि विविध बाजारपेठांमधील आमचे स्थान अधोरेखित करते. लग्नसराईचा हंगाम, नवीन बाजारपेठांमधील विस्तार आणि आकर्षक डिझाइन्सवर असलेला आमचा भर यामुळे आगामी काळातही ही प्रगती कायम राहील, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.