

BMC Affordable medicine initiative
ESakal
मुंबई : मुंबईतील लाखो रुग्णांना परवडणारी आणि सहज उपलब्ध होणारी औषधे मिळावीत यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये "परवडणारे औषध अभियान" सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत, विविध महानगरपालिका रुग्णालय संकुलांमध्ये ५० जेनेरिक औषधांची दुकाने उघडली जातील. जिथे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना चोवीस तास कमी किमतीत औषधे मिळू शकतील. पश्चिम उपनगरातील कूपर रुग्णालयात हा उपक्रम आधीच सुरू झाला आहे.